Harvest Moon 2020: ऑक्टोबर महिना अत्यंत खास आहे. कारण या महिन्यात एक नव्हे तर दोन पौर्णिमेच्या (Full Moon) तिथी आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर चंद्र दर्शन घ्यायचे असल्यास आजची रात्र फार महत्वाची आणि खास आहे. खरंतर ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात पौर्णिमेसह झाली आहे. तर 1-2 ऑक्टोंबरच्या रात्री आकाशात आपल्याला पहिला पूर्ण चंद्र दिसून येणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला हार्वेस्ट मून (Harvest Moon) असे म्हटले जाते. तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना Harvest Moon म्हणजे नेमके काय? कसा पहाल आजचा पूर्ण चंद्र आणि कुठे? तर आजच्या लेखातून आम्ही आज तुम्हाला याबद्दलच अधिक माहिती देणार आहोत.(Venus Is A Russian Planet? शुक्र हा रशियन ग्रह असल्याचा रशिया स्पेस एजन्सीचा दावा, वाचा सविस्तर)
>>हार्वेस्ट मून तिथी आणि वेळ
नासा नुसार, पौर्णिमाची ही तिथी 1 ऑक्टोंबर (गुरुवार) ला आहे. हार्वेस्ट मून 5:05 EDT वर आकाशात दिसण्यास सुरुवात होणार आहे. IST च्या नुसार, हार्वेस्ट मून2 ऑक्टोंबर (शुक्रवार) 2.34AM वाजता मध्यावर असणार आहे. मात्र आज रात्री आणि मध्यरात्रीची पाहता येणार आहे. पूर्ण चंद्राचा दर्शन हे रात्री होणाऱ्या चंद्रोदयाच्या अपेक्षेच्या एकूण 50 मिनिटे उशिराने होते. मात्र हार्वेस्ट मूनच्या जवळ काही रात्रींसाठी चंद्र हा एकाच वेळी दिसतो. फक्त 25-40 मिनटानंतर उत्तर अमेरिकेत आणि 10-20 मिनिटानंतर कॅनाडा आणि युरोप मधील उत्तरेत चंद्रोदय होतो.
>>कुठे आणि कसा पहाल पूर्ण चंद्र?
जर आकाश निरभ्र असल्यास तुम्हाला पूर्ण चंद्राचे दर्शन होऊ शकते. मात्र जर ढग असल्यास तुम्हाला पाहणे थोडे कठीण होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आकाश मोकळे असेल त्या ठिकाणी जावे लागणार आहे. पौर्णिमेचा चंद्र उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहता येणार आहे. मात्र तुम्हाला तो बारकाव्याने पहायचा असल्यास त्यासाठी टेलीफोटो लेन्स किंवा टेलिस्कोपचा वापर करता येऊ शकतो.(Lunar Loo Challenge: NASA ने दिले नवे चॅलेंज- चंद्रावरील टॉयलेटचे डिझाईन बनवा आणि मिळवा 26 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर)
>>हार्वेस्ट मून का म्हटले जाते?
खरंतर वर्षांमध्ये हार्वेस्ट मून सप्टेंबर महिन्यात दिसून येतो. मात्र यंदाच्या वर्षात ऑक्टोंबरच्या सुरुवातीला दिसणार आहे. या चंद्राला प्राचीन युरोपीय वसाहतीमुळे नाव दिले गेले आहे. शेतीच्या काळात कधी-कधी शेतकऱ्यांना रात्रभर शेतात काम करावे लागते. तर चंद्राच्या उजेडामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम करण्यास मदत होते. असे शरद ऋतु विषुवच्या वेळी होते. याच कारणास्तव त्याला हार्वेस्ट मून म्हणून संबोधले जाते.
युएसए मध्ये या चंद्राला ट्रॅव्हल मून, डाइंग ग्रास मून आणि ब्लड मून सारख्या नावाने ओळखले जाते. ही नावे झाडांवरील पाने पडणे आणि गळण्यासंबंधित आहेत. हे झाडांवरील पाने गळून पडण्याचा ऋतु सुरु होणार असल्याचे ही संकेत देतात. तर ऑक्टोंबर महिन्यातील ही पहिली पौर्णिमा पाहण्यासाठी तयार रहा.