Lunar Loo Challenge: NASA ने दिले नवे चॅलेंज- चंद्रावरील टॉयलेटचे डिझाईन बनवा आणि मिळवा 26 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर
National Aeronautics and Space Administration logo | (Photo Credits-.nasa.gov)

अंतराळात आणखी एक मोठे पाऊल टाकण्याचा अमेरिका प्रयत्न करीत आहे. यामुळेच अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) आर्टेमिस मिशन (Artemis Mission) सुरू केले आहे. त्याअंतर्गत नासा चंद्रावर कायमस्वरुपी तळ बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. आता नासाने चंद्रावर एक पाऊल पुढे टाकण्यासाठी एक रोचक स्पर्धा (Lunar Loo Challenge) आयोजित केली आहे. या स्पर्धेत त्यांनी जगभरातील वैज्ञानिक आणि अभियंत्यांना चंद्रावरील कायमस्वरुपी शौचालयाची रचना करण्याचे आव्हान दिले आहे. यामधील बेस्ट डिझाईनला नासाकडूनही 26.5 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आर्टेमिस मिशन अंतर्गत, नासा 2024 पर्यंत चंद्रावर तळ बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

नासाच्या या मिशनसायही चंद्रावर शौचालयाची आवश्यकता भासणार आहे, म्हणूनच त्यांना एक नाविन्यपूर्ण डिझाईन हवे आहे. जो कोणी असे युनिक डिझाईन बनवून देईल, त्याला नासाकडून 26.5 लाखांचे बक्षीस दिले जाईल. चंद्रावर पृथ्वीसारखे गुरुत्वाकर्षण शक्ती नाही, म्हणून सर्व काही अवकाशात फिरत राहते, म्हणूनच हे काम नासासाठी एक आव्हान आहे. अपोलो मिशन दरम्यान, अंतराळवीर लूसाठी प्रौढ डायपरचा वापर करत असत आणि त्यांना बॅगमध्ये ठेवत असता. (हेही वाचा: अंटार्क्टिकामधील जमिनीखाली जगातील सर्वात खोल ठिकाण शोधल्याचा शास्रज्ञांचा दावा; समुद्रसपाटीपासून तब्बल 11,500 फूट खाली)

1975 मध्ये नासाच्या अपोलो अभियानावर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, ‘मानवांसह अंतराळ यान उड्डाण घेईंल तेव्हा, शौच करणे आणि लघवी करणे (Defecation and Urination) ही चिंताजनक बाब आहे.’ या अहवालानंतर जवळपास पाच दशकांनंतर आता अमेरिकेच्या अंतराळ संस्थेला, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या दरम्यान कार्यरत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावरील अंतराळवीरांसाठी शौचालय डिझाइन करायचे आहे. शौचालयाचे डिझाईन सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे.