अंटार्क्टिकामधील जमिनीखाली जगातील सर्वात खोल ठिकाण शोधल्याचा शास्रज्ञांचा दावा; समुद्रसपाटीपासून तब्बल 11,500 फूट खाली
The Antarctic Ice Sheet (संग्रहित संपादित प्रतिमा)

अंटार्क्टिका (East Antarctica), दक्षिण ध्रुवाच्या डेन्मन ग्लेशियरमध्ये (Denman Glacier) जगातील सर्वात खोल जागा (Deepest Point On Land) आढळली आहे. अंटार्क्टिकाचा भौगोलिक नकाशा काढल्यानंतर हा शोध लागला. या गोष्टीशी 'संबंधित एका संशोधकाने म्हटले आहे की, ‘या खंडावर अनेक आश्‍चर्यकारक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे डेन्मन ग्लेशियरमधील सर्वात खोल दरी समुद्र सपाटीपासून 3.5 किमी (11500 फूट) खोल आहे.’ कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला. या गोष्टीला गुरूवारी नेचर जिओसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.

जर आपण पहिल्या शोधाशी तुलना केली तर पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मृत समुद्राच्या काठावर होती, ज्याची खोली 413 मी (1355 फूट) आहे. मात्र आता शास्त्रज्ञांनी याच्याही पुढे जाऊन 11500 फूट खोली असलेली जागा शोधली आहे. या प्रकल्पावर काम करणारे डॉ. मॅथ्यू मॉर्लिग्म म्हणाले, ‘अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या स्तराखालील हा सर्वात अचूक नकाशा आहे आणि हा शोध सर्वात आश्चर्यचकित करणारा आहे.’ डेन्मन ग्लेशियर 20 किमी रूंद असून तो क्वीन मेरी लँडच्या दिशेला आहे. (हेही वाचा: Video: अंतराळातील पहिले हॉटेल; 12 दिवस, दिवसाला 6 कोटी, 24 तासांमध्ये पहा 16 वेळा सूर्योदय)

या शोधातून असे दिसते की, बर्फ समुद्र सपाटीपासून 3500 मीटर खाली गेला. डॉ. मॉर्लिग्म म्हणाले की समुद्रात खंदक खोल आहेत, परंतु ती भूमीवरील सर्वात खोल दरी आहे. पश्चिम प्रशांत महासागरातील मरियाना खंदक अजूनही जगातील सर्वात खोल स्थान आहे. त्याची खोली समुद्रसपाटीपासून 11 किमी वर आहे. अनेक दशकांपासून, रडारची हत्यारे अंटार्क्टिकालामध्ये शोध घेत आहेत. याआधी बर्फ फोडून त्याच्याखालील मूळ रॉक टोपोग्राफीचा मागोवा घेण्याचा खूप प्रयत्न झाला.  परंतु अद्यापही अशी विस्तीर्ण क्षेत्रे आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे किंवा काहीच माहिती नाही.