Coronavirus on Phone Screens and Banknotes: सावधान! तुमच्या फोन स्क्रीन, पैशांच्या नोटांवर कोरोना विषाणू किती दिवस जिवंत राहु शकतो? तुम्हाला माहितीय? घ्या जाणून
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावा, वारंवार हात धुवा, गर्दीत जाणे टाळा यांसारख्या एक ना अनेक गोष्टी सांगितल्या जाता. लोक त्याचे पालनही करतात. परंतू, मोबाईल फोन (Mobile Phone), पैशांच्या नोटा यांचा संपर्क वारंवार येतो आणि तो टाळताही येत नाही. त्यामुले मोबाईल फोन अथवा पैशांच्या नोटा यावर कोरोना विषाणू किती काळ जिवंत राहू शकतो याबाबत तुम्हाला माहिती आहे काय? नुकत्याच पुढे आलेल्या एका संशोधन अहवालानुसार कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरस मोबाईल, चलनी नोटा यांवर एक-दोन नव्हे तर तब्बल 28 दिवस जिवंत राहू शकतो. जगभरातील अनेकांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मोबाईलवर कोरोना व्हायरस आठवडाभर राहु शकतो, असे सांगण्यात आले आहे.ऑस्ट्रेलिया येथील नॅशनल सायन्स एजन्सीने हा अभ्यास केला आहे.

काही दिवसांपूर्वी पुढे आलेल्या एका संशोधन अहवालात म्हटले होते की, चलनी नोटा किंवा काचेच्या पृष्ठभागावर (Glass) कोरना व्हायरस दोन अथवा तीन दिवस, प्लास्टीक किंवा स्टेनलेस स्टील आदिंवर 6 दिवस इतका काळ कोरोना व्हायरस जिवंत राहू शकतो. परंतू, नव्या संशोधनात माहिती पुढे आली आहे की, सर्वसामान्य तापमानात (20 डिग्री सेल्सियस अंश) कोरोना व्हायरस मोबाईल, चलनी नोटा आदींवर 28 दिवस जिवंत राहु शकतो. इतर विषाणूनचे या वस्तूंवर टीकून राहण्याचे प्रमाण आणि कालावधी जवळपास 17 दिवस इतका आहे.(COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca ची कोरोना व्हायरस वरील लस युके मध्ये पुढील 3 महिन्यांत तयार- रिपोर्ट्स)

व्हायरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस थंड वातावरणाच्या तुलनेत उष्म वातावरणात अधिक काळ जिवंत राहतो. 40 डिग्री सेल्सियस तापमानात कोरोना व्हायरस 24 तास जिवंत राहिल्याचे पाहायला मळाले. हा कालावधी 28 दिवसांच्या तुलनेत भलताच कमी आहे.(Covid-19 Vaccine: आता कोरोना विषाणू लस बनवण्याच्या शर्यतीमध्ये Reliance ची उडी; जाणून घ्या कधी सुरु होणार ट्रायल)

दरम्यान, संशोधकांच्या या दाव्याविरुद्ध अनेक वेगवेगळे विचार पुढे येत आहेत. काही संशोधकांनी आक्षेप घेत म्हटले आहेकी, हा दावा लोकांमध्ये उगीचच गैरसमज पसरवू शकेल. तर काही तज्ज्ञांनी म्हटले आहे की, या अभ्यासात सर्दी, शिंक, खोकला यांबाबत विचार करण्यात आला नाही. वास्तवात व्हायरस सर्दी, शिंक, खोकला यांपासून पसरण्याची अधिक शक्यता आहे.काही तज्ज्ञांचे म्हणने असे की, मोकळ्या वातावरणात आणि वस्तुंच्या पृष्ठभागावर कोरोना व्हायरस काही तासच जीवंत राहु शकतो.