Brucellosis | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातील बर्‍याच कंपन्या याची लस (Covid-19 Vaccine) विकसित करण्यात व्यस्त आहेत. आता यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे नावही जोडले गेले आहे. या महिन्यात रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या (Reliance Life Sciences) लसीची जनावरांवर चाचणी होणार आहे. यासाठी रिलायन्स ग्रुप आपले आधीचे बिझनेस- फार्मास्युटिकल्स, रिटेल आणि टेक यांचा उपयोग करून घेणार आहे. कंपनीने यासाठी विस्तृत योजना आखल्या आहेत. यामध्ये चाचणी किट विकसित करणे, चाचणी प्रयोगशाळे चालविणे, लस विकसित करणे, ते बनवणे व त्यांचे वितरण करणे यांचा समावेश आहे.

कोविड-19 साठी रिलायन्स जी लस विकसित करत आहे ती रिकॉम्बिनेंट प्रोटीन-आधारित लस (Recombinant Protein-Based) आहे. असा विश्वास आहे की या लसीची मानवी चाचणी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरू होऊ शकतात. रिलायन्स लाइफ सायन्सेस (RLS) ही रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी आहे. यापूर्वी 6 भारतीय कंपन्या कोरोना लस तयार करण्यात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेक (Bharat Biotech), सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि झायडस कॅडिला (Zydus Cadila) यांचा समावेश आहे. या कंपन्यांना नियामक मान्यता मिळाली आहे.

याबाबत रिलायन्स लाइफ सायन्सेसचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केव्ही सुब्रमण्यम यांनी सांगितले, 'छोट्या प्राण्यांची प्री-क्लीनिकल ट्रायल इन-हाऊस होणार आहे. कंपनीच्या इन-हाऊस रिसर्च सर्व्हिसेस संस्थेच्या माध्यमातूनच लसीची मानवी चाचणी होणार आहे.' रिलायन्स लाइफ सायन्सेस तसेच इतर भागीदारांच्या लसींचे वितरण त्यांचे स्वतःचे व्यवसाय, रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओद्वारे करण्याची योजना आखली गेली आहे. (हेही वाचा: Reliance ने विकसित केली कोरोना व्हायरस चाचणीसाठी RT-PCR Kit; अवघ्या 2 तासांमध्ये मिळणार रिझल्ट)

दरम्यान याआधी रिलायन्स लाइफ सायन्सेसने कोरोना विषाणू चाचणीसाठी आरटी-पीसीआर किट (RT-PCR Kit) विकसित केली आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या चाचणीचे परिणाम सुमारे दोन तासांत प्राप्त होणार आहेत.