सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळामध्ये सर्वजण याबाबतच्या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रुग्णसंख्या वाढू नये किंवा त्यावर नियंत्रण राहावे यासाठी लोकांची जास्तीत जास्त प्रमाणात कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. आता रिलायन्स लाइफ सायन्सेसने (Reliance Life Sciences) कोरोना विषाणू चाचणीसाठी आरटी-पीसीआर किट (RT-PCR Kit) विकसित केली आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या चाचणीचे परिणाम सुमारे दोन तासांत प्राप्त होणार आहेत. कंपनीशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सध्या, आरटी-पीसीआर किटसह होणाऱ्या कोविड-19 चाचणीच्या परिणामांसाठी सुमारे 24 तास लागतात.
सूत्रांनी सांगितले, रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी देशातील SARS-CoV-2 च्या 100 हून अधिक जीनोमचे विश्लेषण केले आणि हे आधुनिक आरटी-पीसीआर किट विकसित केले. हे प्रयोगशाळेत वास्तविक वेळेल कोणत्याही विषाणूच्या डीएनए आणि आरएनएच्या प्रतिकृतीची तपासणी करते आणि सार्स-कोव्ह-2 मध्ये उपस्थित न्यूक्लिक अॅसिडची ओळख पटवते. न्यूक्लिक अॅसिड प्रत्येक ज्ञात सजीव वस्तूंमध्ये आढळते. कंपनीने या किटचे नाव 'आरटी-ग्रीन किट' (R-Green Kit) असे ठेवले आहे. हे किट SARS COV2 Virus चे E-gene, R-gene, RdRp gene ची उपस्थिती शोधू शकते.
या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) तांत्रिक मान्यता मिळाली आहे. रिलायन्स लाइफ ही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी आहे. आयसीएमआरच्या निकालांनुसार, किटमध्ये 98.7 टक्के संवेदनशीलता आणि 98.8 टक्के विशिष्टता दर्शविली गेली आहे. या किटचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे, तो वापरण्यास सुलभ आहे आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे. (हेही वाचा: भाजप खासदार नारायण राणे कोरोना व्हायरस संक्रमित; संपर्कात आलेल्या नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन)
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत मुंबई (Mumbai) हे सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक आहे. मात्र आता मुंबईतील झोपडपट्टी (Slums) भागात झालेल्या दुसऱ्या सीरो-सर्व्हे (Sero Survey) मध्ये एक चांगली बाब समोर आली आहे. यामध्ये लोकांच्या शरीरामधील 'अँटीबॉडीज' पूर्वीच्या तुलनेत 12 टक्के कमी आढळल्या आहेत.