Narayan Rane Infected With Coronavirus: भाजप खासदार नारायण राणे कोरोना व्हायरस संक्रमित; संपर्कात आलेल्या नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

भाजप खासदार नारायण राणे (BJP MP Narayan Rane) कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. माझी कोरोना व्हायरस चाचणी (Coronavirus Test) पॉझिटीव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही राणे (Narayan Rane Infected With Coronavirus) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नारायण राणे यांनी स्वत:ला झालेल्या कोरोना व्हायरस संसर्गाची माहिती देताना सांगितले की, 'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल'.

नारायण राणे यांचे चिरंजीव, माजी खासदार निलेश राणे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यानंतर निलेश राणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेट झाले होते. योग्य उपचार घेतल्यानंतर निलेश राणे हे पूर्ण बरे झाले. निलेश राणे यांनीही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती स्वत:च समाजमाध्यमांद्वारे दिली होती. (हेही वाचा, Nilesh Rane Coronavirus Negative: भाजप नेते निलेश राणे यांनी केली कोरोनावर मात, ट्विट मधुन दिली माहिती)

दरमयान, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत अद्यापही मोठी वाढ होत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 10 लाखांच्याही पुढे गेला आहे. अर्थात कोरोना संक्रमित नागरिकांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) चांगले असले तरी, मृत्यूची संख्याही लक्षणीय आहे. मृत्यूच्या तुलनेत डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. ही दिलासादायक बाब.

नारायण राणे ट्विट

सर्वसामान्य नागरिकांसोबतच, पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांनाही कोरना व्हायरस संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले. योग्य ते उपचार घेऊन ते बरेही झाले आहेत. कोरोना हा आजार गंभीर आणि काही प्रमाणात जीवघेणा असला तरी, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. वेळेतच योग्य उपचार घेतल्यास कोरोना पूर्णपणे बरा होऊ शकतो. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे अवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्याचा आरोग्य विभाग वारंवार करत आहे.