Nilesh Rane Coronavirus Negative: भाजप नेते निलेश राणे यांनी केली कोरोनावर मात, ट्विट मधुन दिली माहिती
निलेश राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांना काही दिवसांंपुर्वी कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार घेउन आता राणे यांंनी कोरोनावर मात केली आहे. स्वतः निलेश राणे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असून, या काळात आपल्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे त्यांंनी आभार मानले आहेत. निलेश राणे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगत त्यांंनी हे ट्विट केले आहे. Coronavirus मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत भाजप नेते निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात; पहा ट्विट

प्राप्त माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी निलेश राणे यांंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यावेळीही त्यांनी ट्विट करुन याबद्दल माहिती होती.प्रकृती स्थिर असल्याने निलेश राणे यांंनी आपल्या मुंबईतील घरात सेल्फ क्वारंटाइन करुन घेतले होते.त्यांंना हॉस्पिटल मध्येही जाण्याची वेळ आली नाही.

निलेश राणे ट्वीट -

दरम्यान, निलेश राणे हे ट्विटर वर बरेच अ‍ॅक्टिव्ह असतात. महाविकास आघाडी आणि त्यातही शिवसेनेच्या कामाकडे त्यांंचे विशेष लक्ष असते, यावरुन च अनेकदा ते आपल्या टिकांंची अस्त्र सोडत असतात. अलिकडे सुशांंत सिंह राजपूत प्रकरणात सुद्धा ते आपल्या ट्विट मधुन राज्य सरकारचा समाचार घेत असतात. क्वारंंटाईन मध्ये असताना सुद्धा त्यांंनी सुशांंत चे प्रकरण सीबीआय कडे सोपावण्याच्या मुद्द्यावरुन बरेच ट्विट केले होते.