Wolf Cloning Successful: आश्चर्यजनक! जंगली आर्क्टिक लांडग्याचे यशस्वी क्लोनिंग; जगातील पहिलीच घटना, चीनी संशोधकांचे यश
Wolf Cloning Successful (Photo Credit - Twitter)

जंगली आर्क्टिक लांडग्याचे (Wild Arctic Wolf) यशस्वी क्लोनिंग करण्यात चीनी प्रयोगशाळेला China-Based Gene Firm) यश आले आहे. जगातील ही पहिलीच घटना आहे. चीन येथील जीन फर्मने ही किमया साधली. सिनोजीन बायोटेक्नॉलॉजी (Sinogene Biotechnology) या फर्मने बीजिंगच्या प्रयोगशाळेत (Beijing Lab) लांडग्याचे यशस्वी क्लोनिंक करण्यात आले. त्यानंतर हा लांडगा ज्याचे 'माया' (Maya) असे नाव आहे तो जगासमोर आला आहे. क्लोनिंग यशस्वी झाल्यानंतर जवळपास 100 दिवसांनी जगातील पहिल्या क्लोन केलेल्या वाइल्ड आर्क्टिक लांडग्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

चायना सायन्सने (China Science) आपल्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, माया, पहिला क्लोन केलेला जंगली आर्क्टिक लांडगा आहे. तो 100 दिवसांचा आहे आणि त्याची तब्येतही चांगली आहे. ग्लोबल टाईम्सनेही याबाबत वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मायाचा डोनर सेल जंगली मादी आर्क्टिक लांडग्याच्या नमुन्यातून आला आहे. त्याची Oocyte मादी कुत्र्यापासून होती आणि तिची सरोगेट आई बीगल होती, असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, बापरे! 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात)

Wolf Cloning Successful (Photo Credit - Twitter)

आर्क्टिक लांडग्याचे क्लोनिंग मादी कुत्र्याच्या एन्युक्लेटेड ओसाइट्स (Enucleated Oocytes) आणि जंगली मादी आर्क्टिक लांडग्याच्या सोमाटिक पेशींपासून 130 हून अधिक नवीन भ्रूण तयार करून पूर्ण केले गेले. यानंतर सात बीगलच्या गर्भाशयात 80 पेक्षा जास्त भ्रूणांचे हस्तांतरण झाले. त्यापैकी एक लांडगा निरोगी म्हणून जन्माला आला.

Wolf Cloning Successful (Photo Credit - Twitter)

दरम्यान, लांडग्याचे सरोगेट म्हणून कुत्र्याची निवड करण्यात आली कारण कुत्र्यांचे अनुवांशिक वंश प्राचीन लांडग्यांशी मिळतेजुळते होते. क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे ते यशस्वी होण्याची अधिक शक्यता मानली गेली जी खरी ठरली असे, तज्ञांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले.

Wolf Cloning Successful (Photo Credit - Twitter)

ट्विट

क्लोन केलेला लांडगा माया आता तिच्या सरोगेट बीगलसोबत (Surrogate Beagle) एका प्रयोगशाळेत राहतो. नंतर हा लांडगा हार्बिन पोलरलँड, ईशान्य चीनच्या हेलॉन्गजियांग प्रांतात स्थानांतरीत केला जाईल आणि नागरिकांना पाहण्यासाठी खुला करुन दिला जाईल.