बापरे! 89 वर्षीय डॉक्टर होता 49 मुलांंचा बाप, काय आहे हे प्रकरण जाणुन माराल डोक्यावर हात
प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

तंंत्रज्ञानाचा गैरवापर करुन गुन्हे करणे हे आता अनेकांंच्या हाताचा खेळ झालाय, नेदरलॅंड (Netherlands)  मध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार अलिकडेच उघडकीस आला आहे. नेदरलँड्सच्या रॉटेरडम मध्ये आयव्हीएफ क्लिनिक (In Vitro Fertilizations Clinic) मधील जन कारबात या तब्बल 89 वर्षीय डॉक्टरने IVF तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन आपल्या तब्बल 49 पेशंट महिलांंमध्ये आपलेच स्पर्म (Sperms) टाकल्याचं कळतंय, यामुळे कारबात हा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 49 मुलांचा बाप असल्याचे समोर आले आहे. याही पेक्षा धक्कादायक म्हणजे जेव्हा हे सगळे प्रकरण समोर आले तेव्हा कारबात यांंचा मृत्युही झाला होता. त्यामुळे त्यांंच्यावर काहीही कारवाई करणे शक्य होणार नाही. काय आहे हा एकुण प्रकार सविस्तर जाणून घ्या.. ऐश्वर्या राय माझी आई, लंडनमध्ये IVF द्वारे दिला होता जन्म; 32 वर्षीय तरुणाचा दावा

डिफेन्स फॉर चिल्ड्रन नावाच्या संस्थेने रॉटेरडम या व लगतच्या भागातील मुलांंचा वैद्यकीय तपास केला होता ज्यात तब्बल 49 मुलांंचे डीएनए रिपोर्ट्स हे समसमान आल्याचे समजले. ही मुले कारबात यांंच्या क्लिनिक मध्ये IVF तंंत्रज्ञानाने जन्मलेली होती. यातील एक मुल तर अगदी डॉ. कारबात यांंच्यासारखेच दिसणारे होते. याप्रकरणी काही वर्ष खटला सुद्धा सुरु होता. ज्यात कारबात यांंनी स्पर्म डोनर ऐवजी आपले स्वतःचेच स्पर्म महिलांंमध्ये टाकल्याचे सिद्ध झाले होते.

दरम्यान, 2009 मध्ये कारबात यांंच्या क्लिनिकवर काही अनियमिततेबाबत आरोप केले गेले होते, त्यानंतर क्लिनिक बंद करण्यात आले होते. 2017 मध्ये डॉ. कारबात यांंचा नैसर्गिक मृत्यु झाला होता.

दुसरीकडे IVF ही नैसर्गिक रित्या बाळ न होऊ शकणार्‍या कपल्ससाठी पालकत्व मिळवण्याची सुवर्णसंधीच मानली जाते. अलिकडे तर,एका महिलेने चक्क 68 व्या वर्षी म्हणजेच वयाच्या सत्तरीला केवळ दोन वर्षे कमी असताना जुळ्या बाळांना जन्म दिला होता. या महिलेने कृत्रिम गर्भधारणा करण्याचे प्रयोग 3 वेळा अयशस्वी झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात या बाळांना जन्म दिला आहे.