Surya Grahan 2022: 30 एप्रिल रोजी होत सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्याचा खास संयोग; गर्भवती महिलांनी करू नये 'हे' काम
Surya Grahan (Photo Credits-ANI)

Surya Grahan 2022: शनिवारी 30 एप्रिल रोजी 2022 सालातील पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan) होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात अंशतः असणार आहे. या दिवशी शनिश्चरी अमावस्या देखील आहे. त्यामुळे सूर्यग्रहण ही नक्कीच एक अद्भुत खगोलीय घटना असेल. धर्मशास्त्रीय आणि हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी करू नये 'हे' काम -

या दुर्मिळ योगायोगात गुंतलेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा मानवाच्या जीवनावर परिणाम होतो. या हानिकारक किरणांचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिला आणि बालकांवर होतो. या दरम्यान गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी खालील काम करू नयेत. (हेही वाचा - African Swine Fever: भारतात आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा उद्रेक; त्रिपुरामध्ये 100 हून अधिक डुकरांचा मृत्यू, फ्लूचा मानवी आरोग्याला धोका आहे का? वाचा सविस्तर)

  • सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कधीही घराबाहेर पडू नये. कारण यावेळी बाहेर पडणारे हानिकारक किरण त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
  • सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये. कारण असे केल्याने त्यांच्या बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते असे मानले जाते.
  • यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचे शिवणकाम व भरतकाम करू नये.
  • सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे, कपडे शिवणे आणि तीक्ष्ण किंवा धारदार हत्यारे वापरणे टाळावे. यामुळे मुलामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
  • सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा.
  • सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ केली पाहिजे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.
  • या दरम्यान गर्भवती महिलांनी जप करावा. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.
  • ग्रहणाचा काळ सुरू होण्यापूर्वी गर्भवती महिलांनी पोटावर गेरूची पेस्ट लावावी.

Disclaimer: या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/श्रद्धा/शास्त्र यातून संकलित करून तुमच्यापर्यंत पोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती वितरीत करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. शिवाय, त्याचा कोणताही उपयोग वापरकर्त्याची स्वतःची जबाबदारी असेल.