African Swine Fever: भारतात आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा उद्रेक; त्रिपुरामध्ये 100 हून अधिक डुकरांचा मृत्यू, फ्लूचा मानवी आरोग्याला धोका आहे का? वाचा सविस्तर
Pig (Photo Credits: PixaBay)

African Swine Fever: भूतानमध्ये भारताच्या सीमेजवळील डुक्कर फार्मवर आफ्रिकन स्वाइन फ्लूचा (African Swine Fever) उद्रेक झाल्याचे जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने (World Organisation for Animal Health, OIE) सांगितले आहे. छुखा जिल्ह्यातील (Chhukha District) अर्ध-व्यावसायिक डुक्कर फार्मवर हा प्रादुर्भाव नोंदवला गेला. याशिवाय त्रिपुराच्या सेपाहिजाला जिल्ह्यातील एका प्रजनन फार्ममध्ये आफ्रिकन स्वाइन फीव्हरची प्रकरणे आढळल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी, त्रिपुरा सरकारने घोषित केले की, संक्रमित डुकरांना एकत्रितपणे मारले जाईल. जेणेकरून संसर्ग राज्याच्या इतर भागात पसरू नये.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्याचे पशु संसाधन विकास मंत्री भगवान दास यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भगवान दास यांनी सांगितले की, विभागाने सिपाहिजाला जिल्ह्यातील देवीपूर येथे असलेल्या सरकारी प्रजनन फार्ममध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरची लागण झालेल्या डुकरांना एकत्रितपणे मारण्याचा निर्णय घेतला आहे. या फिव्हरमुळे शंभरहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे सुमारे 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दास यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - InspectIR COVID-19 Breathalyzer या उपकरणाच्या मदतीने आता श्वासाद्वारे केवळ 3 मिनिटांत होणार कोरोना चाचणी)

दास यांनी पुढे सांगितलं की, 'आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेले आहेत. सर्वजण परत येताच, आम्ही त्यानुसार पुढील कार्यवाही करू आणि जे लोक खाजगी क्षमतेने डुकरांचे पालनपोषण करत असतील, त्यांचे नुकसान झाल्यास त्यांना भारत सरकारने ठरविल्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. संक्रमित डुकरांना मारण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात 8 फूट रुंद व 8 फूट लांबीचा खड्डा खोदून त्यात बाधित डुकरांना मारून पुरण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेताच्या 1 किलोमीटरच्या परिघात उपस्थित असलेली सर्व डुकरे, मग ती सरकारी शेतातील असोत किंवा खाजगीरित्या पाळली जाणारी असोत. त्यांना मारून पुरले जाईल. हा रोग राज्यभर पसरू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

मिझोराममध्ये गेल्या दोन महिन्यांत आफ्रिकन स्वाइन फ्लूने मरण पावलेल्या डुकरांची संख्या 770 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये, या रोगाच्या प्रतिबंधामुळे सुमारे 124 डुकरांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचे सहसचिव डॉ लालहमिंगथांगा यांनी सांगितले की, आफ्रिकन स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आयझॉल, चंपाई, लुंगलेई आणि सैतुअल जिल्ह्यातील सुमारे 17 गावांमध्ये पसरला आहे.

आफ्रिकन स्वाइन फ्लू म्हणजे काय?

आफ्रिकन स्वाइन फीवर (ASF) हा घरगुती आणि जंगली डुकरांमध्ये आढळणारा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे, ज्याचा मृत्यू दर 100% पर्यंत पोहोचू शकतो. हा मानवी आरोग्यासाठी धोक्याचे नाही. परंतु, डुकरांच्या लोकसंख्येवर आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा विनाशकारी परिणाम होतो. हा विषाणू कपडे, बूट, चाके आणि इतर सामग्रीवर जिवंत राहू शकतो. हा विषाणू हॅम, सॉसेज किंवा खारवून वाळवलेले डुकराचे मांस सारख्या विविध उत्पादनांमध्ये देखील टिकून राहू शकतो.