InspectIR COVID-19 Breathalyzer: यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (Food and Drug Administration,FDA) ने श्वासोच्छवासाद्वारे कोविड-19 ओळखू शकणार्या उपकरणाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. हे उपकरण रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये वापरले जाऊ शकते. या उपकरणाच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत कोरोना विषाणूची चाचणी (COVID-19 Diagnostic Test) केली जाऊ शकते.
केवळ 3 मिनिटांत होणार कोरोना चाचणी -
माहितीनुसार, या उपकरणाचे नाव InspectIR COVID-19 Breathalyzer आहे. हे रुग्णालये आणि कोविड चाचणी केंद्रांवर वापरले जाऊ शकते. यासह, तपासणीचा अहवाल तीन मिनिटांत येतो. हे उपकरण केवळ परवानाधारक आरोग्य सेवा प्रदात्याच्या देखरेखीखाली वापरले जाऊ शकते. (हेही वाचा - COVID 19 Precaution Dose Guidelines: नव्या रजिस्ट्रेशनची गरज नाही ते 150 रूपये Service Charge लागू केला जाऊ शकतो; केंद्र सरकारची नियमावली)
कोरोनाची चाचणी करणं होणार सोपं -
FDA च्या 'सेंटर फॉर डिव्हायसेस अँड रेडिओलॉजिकल हेल्थ' चे संचालक डॉ. जेफ शुरेन यांनी कोविड-19 साठी क्लिनिकल चाचण्यांमधील नावीन्यपूर्ण उदाहरण म्हणून याचे वर्णन केले. ते म्हणाले की, यामुळे कोरोना विषाणूची चाचणी मोठ्या प्रमाणात सुलभ होऊ शकते. कोविड-19 च्या बाबतीत, हे एक मोठे यश म्हणून उदयास येईल.
99.3 टक्के अचूक परिणाम -
एफडीएने गुरुवारी सांगितले की, हे उपकरण कोरोना विषाणूची लागण झालेले नमुने ओळखून 91.2 टक्के आणि नकारात्मक नमुने ओळखून 99.3 टक्के अचूक परिणाम देते. एजन्सीने सांगितले की, याद्वारे दररोज 160 नमुने तपासले जाऊ शकतात. हे प्रमाण नंतर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दरमहा 64,000 नमुन्यांची चाचणी करणे शक्य होईल.