5G Internet Services: जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! रिलायन्स जिओ देणार भारतात सर्वात स्वस्त 5G इंटरनेट सेवा
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

गेल्या काही वर्षांत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा देशात मोठा विस्तार झाला आहे. जिओ वापरकर्त्यांचा संख्या देशात मोठी आहे. तसेच जिओची सुरुवातचं त्याच्या स्वस्त कॉल रेट (Calling Rate) किंवा स्वस्त इंटरनेट (Internet) दरापासून झाली. तर आता लवकर भारतात 5G इंटरनेट सेवा (5g Internet Services) सुरु होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात नुकताच 5G  स्पेक्ट्रमचा लिलाव (5G Spectrum Auction) सुरु आहे. या लिलावात देशातील मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) सहभागी झाल्या आहेत तर या लिलावात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीने बाजी मारली आहे.

 

एकूण 88,078 कोटी रुपयांची बोली रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमसाठी लावली आहे. टेलिकॉमच्या 22 सर्कलमध्ये रिलायन्स जिओ सर्वाधिक बोली लावली. रिलायन्स जिओला 700 मेगाहर्ट्जसाठी बोली लावली. या स्पेक्ट्रममध्ये अदानी समूहाच्या अदानी डेटा नेटवर्कसने देखील 400 मेगाहर्ट्जच्या 5 जी स्पेक्ट्रमसाठी 212 कोटींची बोली लावली लावली आहे.  5 जी स्पेक्ट्रममध्ये पहिल्यांदाच अदानी (Adani) आणि अंबानी आमनेसामने बघायला मिळाले असले तरी अंबानींनी या स्पेक्ट्रममध्ये बाजी मारली असं म्हणनं हरकत नाही. (हे ही वाचा:- Online Payment: ‘या’ पाच पध्दतीने ऑनलाईन पेमेंट केल्यास करता येईल पैशाची मोठी बचत)

 

तरी भारतात (India) 5 जी इंटरनेट सेवा सुरु झाल्यानंतर  देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) 5-जी इंटरनेट सेवा जागतिक पातळीवरील मानकांनुसार देणार आहेत. तसेच शिक्षण (Education), आरोग्य (Health), कृषी (Agriculture), ई-गव्हर्नन्स (E-governance) अशा विविध क्षेत्रात रिलायन्स जिओची 5-जी सुविधा उत्तम पध्दतीने देम्याचा प्रयत्न करणार आहे. तरी रिलायन्स जिओ ऑक्टोबर (October) महिन्याच्या अखेरपासून 5-जी सुविधा देणार असल्याची चर्चा आहे.