Online Payment: ‘या’ पाच पध्दतीने ऑनलाईन पेमेंट केल्यास करता येईल पैशाची मोठी बचत
Mobile Phone (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

हल्ली अगदी शॉपिंग मॉलपासून (Shopping Mall) पान टपरीवाल्या (Pan Tapari) पर्यंत सगळीचं लोक ऑनलाईन (Online Payment) पेमेंट स्वीकारताना दिसतात. फक्त शहरी भागातच नाही तरी खेडोपाडी देखील ऑनलाईन पेमेंटचं प्रस्त वाढल्याचं बघायला मिळत. पण ऑनलाईन पेमेंट करायला जेव्हड सोपं दिसत तेवढचं ते सुरक्षित पध्दतीने हाताळनं देखील गरजेचं असतं. कारण जसं का क्लीक (Click) मध्ये पेमेंट होवू शकतं तशीच एका क्लीक मध्ये मोठी गडबड देखील होवू शकते म्हणून ते काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे. हल्ली ऑनलाईन पेमेंटसाठी गुगल पे (google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm) किंवा नेट बॅंकींग (Net Banking) साख्या  विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर होताना दिसतो. हल्ली जवळ फार नोटा बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट हा उत्तम उपाय वाटतो.

 

तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास तुम्हाला बरेचदा मोठी सुट (Offer) पण मिळू शकते. काही ब्रान्ड (Brand) तर ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी अशा विशेष ऑफर घेवून येत असतात. खरेदी केल्यावर सुरक्षित ऑनलाईन पेमेंट करत पैस कसे वाचवायचे या बाबतच्या काही टिप्स (Tips) आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

ऑनलाईन पेमेंट करताना या 5 बाबी नक्की लक्षात ठेवा:- 

 

1. सक्रीन लॉक 

तुम्ही तुमच्या मोबाईलचा ऑनलाइन पेमेंटसाठी वापर करत असल्यास तुमच्या मोबाईलची सक्रीन कायम लॉक ठेवा. म्हणजे कधी फोन हरवल्यास किंवा कुठे अनोळखी जागी विसरल्यास तुमचं ऑनलाईन पेमेंट कुणी हाताळू शकणार नाही.

 

2. तुमचा पीन खासगी ठेवा

ऑनलाईन पेमेंटसाठी आवश्यक असतो तो तुमचा पीन. तर तुमचा पीन किंवा ऑनलाईन पेमेंट सबंधी कुठलीही माहिती कुणा बरोबर शेअर करु नका.

 

3. अनोळखी लिंकवर क्लीक करु नका

ऑनलाईन पेमेंट मोबाईलवर अॅक्टीव्हेट असता त्यावर विविध अनोळखी फोनवरुन कॉल मेसेज येत असतात तरी अशा कुठ्ल्याही मेसेज द्वारे आलेल्या लिंकवर क्लीक करु नका.

 

4. UPI अॅप अपडेट 

तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी वापरत असलेल अॅप नियमित अपडेट करत राहा. तुम्ही वापरत असलेल्या अॅपचं अपडेटेड व्हर्जन वापरा.

 

5. विविध UPI अॅप वापरण टाळा 

तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी विविध UPI अॅप  वापरत असाल तर ते वापरणं टाळा. कुठल्याही एकाचं अॅपचा नियमितपणे वापर करा.