Realme 6i (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme यांनी नुकताच भारतीय बाजारात त्यांच्या 6 सीरिज मधील दोन स्मार्टफोन Realme6 आणि Realme6 Pro लॉन्च केला होता. हे दोन स्मार्टफोन सध्या सेलसाठी उपलब्ध आहेत. तसेच 6 सीरिज मधील नवा स्मार्टफोन Realmi 6i लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीकडून याबाबत अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, येत्या 17 मार्चला Realme 6i लॉन्च करण्यात येणार आहे. तर MediaTek Helio G80 चिपसेट सोबत येणार जगातील प्रथम स्मार्टफोन असणार आहे.

Realme यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. कंपनी रिअलमी 6i सध्या म्यानमार येथे लॉन्च करत आहे. तसेच कंपनी ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या फिचर्स बाबत सुद्धा अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. पण गेल्या वर्षात लीक झालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये 18W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येऊ शकते. तसेच युएसबी सी पोर्ट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन FCC वर लिस्ट करण्यात आला होता. फोनमध्ये मागील बाजूल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येऊ शकतो.(भारतीयांनो तयार रहा; 'या' दिवशी लाँच होणार देशातील पहिला 5G Smartphone Realme X50 Pro; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये)

नव्या रिअलमी 6 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 64MP प्रायमरी कॅमेरा सेंसर पेक्षा कमी आहे. तर रिअलमी 6 प्रो मध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यासाठी ग्राहकांना 16,99 रुपये मोजावे लागणार आहेत. तर जाणून घ्या रिअलमी 6 आणि रिअलमी 6 प्रो या स्मार्टफोसाठी कोणते फिचर्स देण्यात आले आहेत.