प्रयागराज पोलिसांनी अमित कुमार झा ला अटक केली आहे. अमित कुमार याने महाकुंभ 2025 मध्ये महिलांचे आंघोळ आणि कपडे बदलण्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याने युट्युब चॅनेल मॉनटाईज करण्यासाठी आणी फॉलोवर्स वाढवण्यासाठी हे व्हिडिओ शेअर केले आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी वापरलेला Android phone जप्त केला आहे. सायबरक्राईम तपासामध्ये आरोपीला पश्चिम बंगाल मध्ये अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील अश्लील सामग्रीतून फायदा मिळवण्याचा त्याचा उद्देश होता. ही एक वेगळी घटना नाही, कारण महाकुंभमध्ये गोपनीयतेचे उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यूपी पोलिसांनी 17 सोशल मीडिया खाती ओळखली आहेत ज्यात महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर करणे आणि त्यांची विक्री करणे समाविष्ट आहे. अशा गुन्ह्यांसाठी सोशल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)