पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या Ministry of Home Affairs, कडून 16 पाकिस्तानी युट्युब चॅनेल्स वर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारताचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी व दिशाभूल करणार्‍या स्वरूपात पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. चूकीची माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचं सरकार कडून सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Vinay Narwal चा पत्नी सोबत रोमॅन्टिक अंदाजात शेवटचा डान्स व्हिडिओ म्हणून वायरल क्लिप Instagram Influencers Ashish Sehrawat-Yashika Sharma ची; जोडप्याचा खुलासा. 

Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News सह 16 युट्युब चॅनल्सवर बॅन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)