Himachal Pradesh Weather Update

Himachal Pradesh Weather Update: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. कुल्लू, मनाली आणि आजूबाजूच्या भागात दरड कोसळण्याची ही शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहेत. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेगाने वाहणाऱ्या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली, तर काही ठिकाणी वाहने ढिगाऱ्यात अडकली आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये कार वाहून गेल्याचे दिसत आहे, लोक सुरक्षित ठिकाणी पलायन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ 

प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी-नाल्याजवळ जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. डोंगराळ भागात सतर्क राहण्याचा सल्ला डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.