Sikandar Teaser (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Sikandar Teaser Out: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) च्या आगामी 'सिकंदर' (Sikandar) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता सलमान खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. यावर्षी ईदला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. सलमान खानने हा टीझर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना सलमान खानने लिहिले की, 'जो हृदयावर राज्य करतो त्याला सिकंदर म्हणतात.' हा चित्रपट दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक मुरुगुदास यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सलमानच्या या टीझरमध्ये उत्कृष्ट अ‍ॅक्शन पाहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील सुपरहिट दिग्दर्शक एआर मुरुगुदास यांनी केले आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत प्रतीक बब्बर देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच काजल अग्रवाल, शर्मन जोशी, सत्यराज, अंजली धवन आणि प्रतीक बब्बर हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (हेही वाचा - Shah Rukh Khan Moving Out Of Mannat: 'मन्नत'मधून बाहेर पडत आहेत शाहरुख खान आणि कुटुंबीय; राहणार दरमहा 24 लाख भाडे असलेल्या अपार्टमेंटमध्ये- Reports)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, सलमान खानचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. बऱ्याच काळानंतर सलमान खान पुन्हा एकदा पडद्यावर परतत आहे. या चित्रपटात तो अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटात सलमान खान दिसला होता. यापूर्वी 2023 मध्ये आलेल्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. आता सलमान खान पुन्हा एकदा 'सिकंदर' या चित्रपटातून प्रेक्षकांचा मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.