
National Science Day 2025 HD Images: भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day 2025) साजरा केला जातो. या दिवशी भारतीय शास्त्रज्ञांचा सन्मान केला जातो. आपल्या जीवनात विज्ञानाचा प्रभाव ओळखणे, त्यांचा सन्मान करणे आणि हा बदल घडवून आणणाऱ्या भारतातील महान शास्त्रज्ञांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रमण इफेक्टचा शोध लावणारे सर सी.व्ही. रमण यांना आदरांजली अर्पण करून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. सी व्ही रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील भारतातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.
देशभराती शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक असे मेसेज, व्हाट्सअप स्टेटस, घेऊन आलो आहोत. हे तुम्ही राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी वापरू शकता. याशिवाय, तुम्ही या शुभेच्छा संदेशाचा उपयोग फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस म्हणून ठेवू शकता.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा -
देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या
सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार
समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विज्ञानाच्या चष्म्यातून जग पाहू,
देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ,
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या
शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

1986 मध्ये, राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषदेने (NCSTC) भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्याची विनंती केली, जी तत्कालीन भारत सरकारने स्वीकारली. त्यानंतर 1986 मध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आला.