AFG vs AUS (Photo Credit - X)

AFG vs AUS 10th Match: चॅम्पियन्स ट्रॉफीचा 10वा सामना ब गटातील अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. या सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत पोहोचेल. या दृष्टीने, हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. अफगाणिस्तान त्यांचा शेवटचा सामना जिंकल्यानंतर मैदानात उतरणार आहे तर ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. जर आपण ग्रुप बी मधील पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांतून तीन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, उद्याचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकाॅर्ड

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड टू हेड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कांगारू संघाने चारही वेळा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान अजूनही या संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात आहे. (हे ेदेखील वाचा: AFG vs AUS ICC Champions Trophy 2025 Live Streaming: सेमीफायनलच्या लढतीसाठी ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान येणार आमनेसामने, येथे जाणून घ्या कुठे पाहणार सामना?)

खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान स्थिती

ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. तथापि, फिरकी गोलंदाजांना मधल्या षटकांमध्येही मदत मिळते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, सामना सुरू होईपर्यंत पाऊस थांबेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान - रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी.

ऑस्ट्रेलिया - मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, स्पेन्सर जॉन्सन.