National Science Day 2025 Wishes 6 (Photo Credit - File Image)

National Science Day 2025 Wishes In Marathi: दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन (National Science Day 2025) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांनी 'रामन इफेक्ट' शोधला होता. यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिन पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1997 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून, हा दिवस दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा उद्देश महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना त्यांच्या योगदानाबद्दल स्मरण करणे आहे. या दिवशी देशातील विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विज्ञाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. तथापी, या दिवशी तुम्ही आपल्या विज्ञानप्रेमी मित्र-मैत्रिणींना Message, WhatsApp Status, Images द्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा - 
28 फेब्रुवारी हा भारतामध्ये
“राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार
समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

National Science Day 2025 Wishes 1 (Photo Credit - File Image)

दृष्या मागील अदृश्यच तर्कशुद्ध विवेचन
म्हणजे विज्ञान
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day 2025 Wishes 2 (Photo Credit - File Image)

देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या
शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day 2025 Wishes 3 (Photo Credit - File Image)

विज्ञानातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतात.
त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा,
हा मूळ उद्देश समाजात रुजायला हवा.
त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील
राहण्याचा संकल्प करूया.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

National Science Day 2025 Wishes 4 (Photo Credit - File Image)

विज्ञान शिकता शिकता
विज्ञान जगता आले पाहिजे,
शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय !!
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day 2025 Wishes 5 (Photo Credit - File Image)

सीव्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. सी.व्ही. रमन यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.