
जर तुम्ही श्रीमंत असाल आणि अमेरिकन नागरिक बनू इच्छिता, तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अमेरिकेत तुमचे स्वागत करण्यास तयार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन 'गोल्ड कार्ड' योजना (US Gold Card) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवासी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (43 कोटी रुपयांपेक्षा जास्त) देऊन हे विशेष कार्ड मिळवू शकतात. हे गोल्ड कार्ड ग्रीन कार्डचे प्रीमियम व्हर्जन आहे आणि अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यात मदत करेल. हे कार्ड केवळ ग्रीन कार्डचे विशेष अधिकारच प्रदान करणार नाही, तर श्रीमंत स्थलांतरितांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची संधी देखील प्रदान करेल.
ओव्हल ऑफिसमध्ये वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, हे कार्ड पाच दशलक्ष डॉलर्समध्ये उपलब्ध असेल. ज्यांना हे कार्ड हवे आहे ते ते खरेदी करू शकतील. यानंतर, त्यांना 'ग्रीन कार्डचे फायदे आणि बरेच काही' मिळेल. ही योजना दोन आठवड्यात सुरू होईल. अमेरिकन राष्ट्रपतींच्या मते, हा अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा एक मार्ग आहे. याचा अमेरिकेला मोठा फायदा होईल. याचे कारण असे की फक्त श्रीमंत लोकच हे कार्ड खरेदी करू शकतील आणि अमेरिकेत स्थायिक होऊ शकतील. हे लोक येथे गुंतवणूक करतील आणि भरपूर नोकऱ्या निर्माण करतील.
लुटनिक म्हणाले, नवीन 'गोल्ड कार्ड' उपक्रम सध्याच्या EB-5 कार्यक्रमाची जागा घेऊ शकतो, जो स्थलांतरित गुंतवणूकदारांना अमेरिकन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून ग्रीन कार्ड मिळवण्याची परवानगी देतो. त्यांनी सांगितले की 'गोल्ड कार्ड'साठीचे पैसे थेट सरकारकडे जाऊ शकतात. आपण EB-5 कार्यक्रम संपवणार आहोत आणि ते गोल्ड कार्डने बदलणार आहोत. ट्रंप प्रशासनाला काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही. मात्र, ही योजना कशी राबवली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: Kash Patel Becomes New FBI Director: भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती; मानले जातात Donald Trump यांचे निकटवर्ती सहकारी)
US Gold Card:
President Trump wants to offer wealthy immigrants “gold cards,” offering to sell them the possibility of citizenship for $5 million. Commerce Secretary Howard Lutnick suggested the program would begin in two weeks and replace the existing EB-5 immigrant investor program. pic.twitter.com/SSNMLPjtln
— The Associated Press (@AP) February 26, 2025
या कार्यक्रमाच्या माध्यमातून 10 लाख गोल्ड कार्ड विकण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून संघीय तुटी कमी करण्यास मदत होईल. दरम्यान, सध्याचा EB-5 व्हिसा कार्यक्रम गुंतवणूकदारांना अमेरिकन व्यवसायांमध्ये सुमारे $1 दशलक्ष (किंवा काही क्षेत्रांमध्ये $500,000) गुंतवून आणि किमान 10 रोजगार निर्माण करून ग्रीन कार्ड मिळवण्याची परवानगी देतो. नवीन ट्रम्प गोल्ड कार्ड या कार्यक्रमाच्या माध्यमातून, गुंतवणुकीची रक्कम वाढवून $5 दशलक्ष करण्यात आली आहे, ज्यामुळे श्रीमंत गुंतवणूकदारांना अमेरिकन अर्थव्यवस्थेत अधिक मोठे योगदान देण्याची अपेक्षा आहे.