Knife Attack | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Crime News: विरार (Virar Shocker) येथील एका औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या 23 वर्षीय फार्मिसिस्ट तरुणीवर एका 24 वर्षीय तरुणाने चाकू हल्ला (Stabbing Incident) केला. हल्लेखोराचे नाव अक्षय पाटील तर पीडितेचे नाव भाविका गावड असे आहे. विरार पोलिसांनी (Virar Police) त्यास अटक केली आहे. आरोपीच्या हल्ल्यामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर, छातीवर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या तिच्यावर या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात उपचार सुरु आहेत. आरोपी आणि पीडिता प्रियकर प्रेयसी असल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या वडीलांना फोन केला आणि त्यांना 'होय, तिला मी मारले आहे' अशी माहिती दिली.

आरोपीस अटक

पोलिसांनी आरोपी अक्षय पाटील अटक केली आहे. पोलीस सध्या हल्लेखोराने केलेल्या हल्ल्याच्या कारणांचा शोध घेत आहेत. पीडिता भाविका गावड हिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती देताना म्हटले आहे की, पीडितेच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे विरारमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

हल्लेखोराचा पीडितेच्या वडिलांना फोन

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर अक्षय पाटील हिने तरुणी भाविका हिच्या वडिलांना फोन केला आणि मोठ्या रुबाबात सांगितले की, होय, मी स्वत: तिला मारले आहे. वडीलांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, 'त्याने (अक्षय) आम्हाला फोन केला आणि तो म्हणाला 'मी तुमच्या मुलीला मारले आहे'. अक्षयने दिलेल्या माहितीवरुन कुटुंबीयांनी दुकानामध्ये धाव घेतली असता त्यांना त्यांची मुलगी बेशुद्ध आवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. (हेही वाचा, Virar Murder Case: विरारमध्ये 60 वर्षीय महिलेची जावयाकडून हत्या; आरोपीला अटक)

लग्नाची चर्चा पण, करीअरवर लक्ष

दरम्यान, अक्षय आणि भाविका हे पाठिमागील काही दिवसांपासू परस्परांच्या रिलेशनमध्ये होते. पुढे जाऊन विवाह करण्याचा त्यांचा विचार होता. त्यांच्या नात्याबद्दल दोघांच्याही कुटुंबीयांना कल्पना होती. त्यातूनच पाटील याचे कुटुंब भाविकाच्या घरी विवाहाबद्दल चर्चा करण्यासही गेले होते. दरम्यान, भाविका हीस शिक्षण पूर्ण करायचे असल्याने आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे असल्यामुळे लग्नासाठी एक वर्ष पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मुलीने करीअर करण्याची इच्छा व्यक्त केल्याने अक्षय नाराज झाले होते. त्यातूनच त्याने तिची इच्छा नसताना तिस भेटायला येण्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मुलीच्या सुरक्षिततेबद्दल आणि करिअरबद्दल चिंतेत असलेले भाविकाचे पालक पाटीलच्या घरी गेले आणि ती तयार होईपर्यंत त्याला दूर राहण्यास सांगितले. (हेही वाचा -Vasai Murder Case: ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रेयसीची निर्घृण हत्या, वसईतील थरकाप उडवणारी घटना)

स्वयंपाकघरातील चाकू वापरून हल्ला

पोलिसांनी सांगितले की, अक्षय पाटील हा भाविका हिचा पाटलाग करत असे. तिच्या कामावर जाण्याच्या आणि घरी निघण्याच्या वेळा यांवर तो लक्ष ठेवत असे. कोणत्या वेळी ती दुकानामध्ये एकटी असू शकते याची त्याला कल्पना होती. संधी पाहून बुधवारी दुपारी तो दुकानात घुसला, सोबत आणलेला स्वयंपाकघरातील चाकू बाहेर काढला आणि वारंवार तिच्यावर वार केला. घाबरून खाली कोसळलेल्या भाविका हिच्यातोंडावरही आक्षय याने लाथ मारली, अशी माहिती विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लालू तुरे म्हणाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.