PDA | (Photo Credits: Pune X)

Traffic Rules Violation: मोटारसायकलवरून रस्त्यावरुन वेगाने जाताना सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे चाळे आणि त्याचे प्रदर्शन (Public Displays of Affection) करणाऱ्या एका जोडप्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. सर्जापूर मेन रोडवर टिपलेल्या या फुटेजमध्ये हेल्मेट नसलेला एक चालक गर्दीच्या वाहतुकीतून स्टंट (Bike Stunt) करत जात असल्याचे दिसून येते. एक महिला त्याच्यासोबत इंधन टाकीवर धोकादायकपणे बसली आहे. दोघांचेही चेहरे समोरासमोर आहेत शारीरिक जवळीक वाढलेली दिसते आहे. बाईकवर असलेल्या नोंदणी क्रमांकावरुन ही दुचाकी तामिळनाडू राज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. अधिक तपशिलाची प्रतिक्षा आहे.

पर्वा स्टंटमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका

सार्वजनिक ठिकाणी केली जाणारी स्टंटबाजी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन याविरोधात पोलिसांकडून अनेकदा कारवाई होते. असे बाईक स्टंट करु नयेत याबाबत पोलिसांकडून कायदेशीर कारवाईचा ईशाराही दिला जातो. पण, तरीदेखील अशी जोडपी असे स्टंट करत असतात. बेपर्वा स्टंटमुळे सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे. या व्हिडिओमुळे रस्ता सुरक्षा आणि जबाबदार ड्रायव्हिंगबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे, असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. (हेही वाचा, Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई (Watch))

बेपर्वा रोड स्टंटबद्दल सार्वजनिक संताप

व्हायरल क्लिपवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून तीव्र टीका झाली आहे, अनेकांनी जोडप्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी बेंगळुरू वाहतूक पोलिसांना टॅग केले आहे आणि रस्ता सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन केल्याबद्दल दंडाची मागणी केली आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, 'ही शुद्ध निर्लज्जता आहे! दोघांनाही एकत्र तुरुंगात टाकले पाहिजे आणि तिथे प्रेमात पडू दिले पाहिजे.' दुसऱ्याने उपहासात्मक टिप्पणी केली, 'लोक मागील दृश्य दिसावे यासाठी आरसे लावतात, परंतु या व्यक्तीने मानवी पर्याय निवडला आहे.' (हेही वाचा, Bengaluru Couple Rides Scooter: मुलाला पायट्यावर उभा करुन जोडप्याचा दुचाकीवरुन प्रवास, Viral Video पाहून सोशल मीडियावर संताप)

भररस्त्यात प्रेमाचे चाळे

अशा घटनांमुळे वाहतूक कायद्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, जरी अधिकारी बेपर्वा वाहन चालवणे आणि धोकादायक स्टंटबाजीविरुद्ध इशारे देत राहिले असले तरी. सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी केल्याने केवळ चालकांचे जीवन धोक्यात येत नाही तर इतर प्रवाशांनाही धोका निर्माण होतो. वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान, अशा धोकादायक वर्तनाला आळा घालण्यासाठी जनतेकडून रस्ते सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी आणि मोठ्या दंडाची मागणी केली जात आहे. भारतामधील विविध शहरांमध्ये या आधीही अशा प्रकारच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत.