
Uttarakhand Weather: उत्तराखंड (Uttarakhand News) राज्यातील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम (Badrinath Disaster) येथील हिमनदी फुटली (Glacier Burst) आहे. ज्यामुळे 47 कामगार बर्फाखाली अडकले (BRO Workers Trapped) आहेत. हे सर्व कामगार सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) बांधकाम प्रकल्पासाठी काम करत होते. हीमकडा कोसळण्याची ही घटना माना गावाजवळ शुक्रवारी (28 फेब्रुवारी) दुपारी घडली. प्रशासनाने मदत आणि बचावकार्य अत्यंत वेगाने सुरु केले आहे. आतापर्यंत 10 कामगारांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, बर्फाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने मदत आणि बचावकार्यास अडथळा निर्माण होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बचाव कार्यात अडथळा
हिमनदी फुटल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. कामगारांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी किमान 10 रुग्णवाहीका पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतू, हवामान इतके प्रतिकूल आहे की, ही मदत तिथपर्यंत पोहोचवता येत नाही. सतताच पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर पडणारे बर्फ यांमुळे मदत पोहोचविण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळा येतो आहे. तरीसुद्धा आम्ही प्रतिकुल परिस्थितीमध्ये मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ततच्या पावसामुळे झालेल्या मुसळधार हिमवर्षाव आणि भूस्खलनामुळे बचाव कार्य कठीण झाले आहे, असेही हे अधिकारी म्हणाले.
दरम्यान, उत्तराखंड राज्यात हमकडा (हिमनदी) कोसळण्याच्या एक दिवस आधी मुसळधार पावसामुळे या प्रदेशात भूस्खलन झाल्याची नोंद झाली होती. ज्यामुळे अनेक ठिकाणी मातीचे ढिगारे आणि दगड पडले होते. (हेही वाचा, Uttarakhand Glacier Burst: चमोली दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी सरसावला भारताचा स्टार फलंदाज, केली मोठी घोषणा)
उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तरकाशी, चमोली आणि रुद्रप्रयागसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पश्चिमी विक्षोभ तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उंचावरच्या भागात मुसळधार बर्फवृष्टी होईल आणि खालच्या भागात पाऊस पडेल, ज्यामुळे बचाव कार्य आणि स्थानिक समुदायांसाठी परिस्थिती आणखी बिकट होईल, असेही आयएमडीने म्हटले आहे.
कामगार बर्फाखाली अडकले
Uttarakhand | Police Headquarters spokesperson IG Nilesh Anand Bharne tells ANI, "A massive avalanche has occurred near the Border Roads Organisation camp in the border area of Mana in which 57 workers engaged in road construction have been trapped. Out of these workers, 10… pic.twitter.com/5A6e1V7ncQ
— ANI (@ANI) February 28, 2025
भूस्खलन, कोसळणारा बर्फ आणि त्यामुळे निर्माण झालेली तीव्र हवामान परिस्थिती लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून 1मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत बाधित भागात वाहनांची हालचाल मर्यादित केली आहे, सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, बचाव पथके बेपत्ता कामगारांना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याने अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक प्रशासन, बीआरओ आणि आपत्ती प्रतिसाद दल अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहकार्य करत आहेत. कारण नसताना घराबाहेर पडू नये, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.