
भारतामध्ये पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे. याआधी बंगळुरूच्या अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले होते, आता उत्तर प्रदेशमधून पुन्हा अशीच भयानक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आयटी कंपनीतील मॅनेजर मानव शर्मा यांने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, मानवने एक व्हिडिओ बनवला आणि शेअर केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या मृत्यूसाठी त्याच्या पत्नीला जबाबदार धरले. तरुणाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मृताच्या वडिलांनी त्याच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आग्रा येथील डिफेन्स कॉलनी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मानव शर्मा एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्याने स्वतःच्या घरात आत्महत्या केली. मरण्यापूर्वी, मानवने एक भावनिक आणि वेदनादायक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीच्या वागण्यावर आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या व्हिडिओमध्ये तो रडत रडत त्याची कहाणी सांगत आहे आणि म्हणतो की, त्याच्या पत्नीच्या छळामुळे त्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले.
TCS Manager Dies by Suicide:
Another man forced to take his own life by his wife. Agra, UP.
- Manav Sharma
- Worked as a manager at TCS
- Got married in January 2024
- Took his wife to live with him in Mumbai for work
- His wife threatened to file false cases
- She wanted to live with her… pic.twitter.com/4atXqVp7KO
— Baba Banaras™ (@RealBababanaras) February 28, 2025
6 मिनिटे 57 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मानवने आपले दुःख उघडपणे व्यक्त केले. तो म्हणतो, 'मी आधीही हे करून पाहिले होते पण आता मला माझ्या पत्नीचा इतका त्रास झाला आहे की माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय उरला नाही.' व्हिडिओमध्ये तो कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि म्हणतो, 'पुरुषांच्या संरक्षणासाठी कोणताही कायदा नाही. पुरुष खूप एकाकी पडतात. त्यांच्यासाठी कोणी का बोलत नाही?’ (हेही वाचा: Virar Shocker: आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि मुलीची केली हत्या; नंतर स्वतःलाही गळफास लावला, विरार येथील धक्कादायक घटना)
मानवच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाचे गेल्या वर्षी लग्न झाले. नोकरीमुळे मानव त्याच्या पत्नीला मुंबईला घेऊन गेला होता. पण तिथे त्याची बायको त्याच्याशी रोज भांडायची. वडिलांचा दावा आहे की, सुनेने मानवचा केवळ मानसिकच छळ केला नाही तर, तिने संपूर्ण कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. याशिवाय, पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस मानव आपल्या पत्नीसह मुंबईहून आग्र्याला परतला होता. पण तो घरी पोहोचताच त्याची पत्नी तिच्या पालकांच्या घरी गेली. मानवच्या वडिलांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि पत्नी आणि सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.