
Fishing Boat Catches Fire Off Alibaug Coast: अलिबाग किनाऱ्याजवळ (Alibaug Coast) मासेमारी बोटीला भीषण आग (Fishing Boat Catches Fire)लागल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान, अलिबाग किनाऱ्यापासून सुमारे 6 ते 7 नॉटिकल मैल अंतरावर राकेश गण यांच्या मासेमारी बोटीला ही आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच, भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने तातडीने आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद दिला. बोटीतील सर्व 18 क्रू सदस्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, अधिकारी आगीचे कारण तपासत आहेत, तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सागरी सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आगीत जळून खाक झाली. ज्यामुळे मासेमारीच्या जाळ्यांसह तिच्या 80 टक्के संरचनेचा नाश झाला. सुदैवाने, त्यावरील सर्व 18 खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. (हेही वाचा -Kolhapur: कोल्हापूर येथील राजाराम सहकारी साखर कारखान्यास भीषण आग, अग्निशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी दाखल)
अलिबाग किनाऱ्यावर मासेमारीच्या बोटीला आग, पहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: The fishing boat of one Rakesh Gan caught fire 6-7 nautical miles from the coast in Raigad district in In Akshi Alibaug, around 3-4 am. Indian Coast Guard and Indian Navy rescued all 18 crew members from the boat safely: Raigad SP
(Video: Raigad Police) pic.twitter.com/6f4MFm0aQn
— ANI (@ANI) February 28, 2025
शुक्रवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान, किनाऱ्यापासून सुमारे सहा ते सात नॉटिकल मैल अंतरावर आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताचं स्थानिक मच्छीमार, तटरक्षक दल आणि नौदलाच्या बोटी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर, जळत्या बोटीला किनाऱ्याजवळ आणण्यात आले. (हेही वाचा, Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक; कलाकारांना अश्रू अनावर)
तथापी, आग वेगाने पसरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने बोट सुरक्षित ठिकाणी आणण्यात मदत झाली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी सध्या घटनेचा तपास करत आहेत.