Mobile | (Images Used for Representational purposes only । Photo Credits: pixabay)

काही महिन्यांपूर्वी एअरटेलसह (Airtel) जवळपास सर्वच कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमती (Mobile Tariff Hike) वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. आता एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा झटका देण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. तुम्हीही एअरटेलचे ग्राहक असाल तर लगेच जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे. किंबहुना, भारती एअरटेल लिमिटेडने आधिकाऱ्याने सांगितले प्लॅनच्या किमती पुन्हा वाढू शकतात. कंपनीने सांगितले की पुढील तीन ते चार महिन्यांत नाही तर, चालू वर्षातच नंतर आणखी एका किमतीत वाढ होऊ शकते आणि कंपनी किमत वाढीसाठी पुढाकार घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. सरासरी प्रति ग्राहक महसूल हा 200 रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये एअरटेलने मोबाइल आणि सेवांच्या दरात 18 ते 25 टक्क्यांनी वाढ केली होती.

प्रति ग्राहक महसूल 200 रुपयांवर पोहचण्याची अपेक्षा

दरवाढीच्या या स्पर्धेत एअरटेल पुढे जाण्यास कचरणार नाही, असे कंपनीच्या अधिका-याने स्पष्ट केले. प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPQ) 200 रुपयांपर्यंत आणण्याचा कंपनीचा मानस आहे. एअरटेलचे शेअर्स बुधवारी 1.55% वाढून NSE वर 719.90 वर बंद झाले. एअरटेल ने डिसेंबर मध्ये निव्वळ नफ्यात 3% घसरण नोंदवून 830 कोटींवर रुपयावर आला आहे, जो मागील वर्षीच्या 854 रुपयाच्या कोटीच्या तुलनेत होता, तर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 13% वाढला आहे. (हे ही वाचा Google Chrome चा वापर करत असाल तर सावधान! सरकारने दिला 'हा' इशारा)

दरवाढीची सुरुवातीची चिन्हे उत्साहवर्धक आहेत

याच वर्षात टॅरिफ दर वाढण्याचे संकेत भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गोपाल विठ्ठल यांनी दिले. मात्र तुर्तास चार महिने हा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या नेटवर्क सक्षमता आणि वेग वाढीवर भर देऊन वापरकर्त्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानंतर याच वर्षात दरवाढ करण्यात येणार आहे. प्रतिस्पर्धी तोपर्यंत काय भूमिका घेणार याकडे एअरटेलचे लक्ष असेल. मात्र त्यांनी काही हालचाल केली नाही तरी भारती एअरटेल दरवाढ करण्यात मागचापुढचा विचार करणार नसल्याचे विठ्ठल यांनी स्पष्ट केले.