Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

भारत सरकारने गुगल क्रोम वापर करणाऱ्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरंतर मिनिस्ट्री फ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इंन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंडियन कंप्युटर इमर्जेंसी  रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून गुगल क्रोम युजरवर सातत्याने सायबर हल्ले केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यानुसार, क्रोम ब्राउजर मध्ये काही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत ज्या सायबर हल्ल्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. यापासून बचाव करण्यासाठी CERT-In कडून गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

CERT-In ने सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तातडीने क्रोम ब्राउजर अपडेट  करण्याचे निर्देशन दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, जर क्रोम ब्राउजर अपडेट केले नसल्यास ते हॅकर्सकडून काही कोड्सचा वापर करुन सिस्टिमचा कंट्रोल मिळवू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला क्रोमच्या 98 त्रुटी गुगलकडून सुधरवण्यात आल्या आहेत. एजेंसीने असे म्हटले की, 98.0.4758.80 च्या आधीचे गुगल क्रोमचे वर्जन हॅक केले जाऊ शकतात.(Boult Audio चे नवीन इयरफोन लाँच; 10 मिनिटे चार्ज करून ऐका 10 तास म्यूझिक)

गुगलने नुकत्याच पब्लिकली विंडोज, मॅकओएस आणि लिनक्स युजर्ससाठी क्रोम 98 जाहीर करण्याची घोषणा केली होती. कंपनीने असे म्हटले होते की, अपडेटमध्ये एकू 27 सिक्युरिटी फिक्सचा समावेश आहे. गुगलने अपडेट जारी करत म्हटले की, जो पर्यंत बहुतांश युजर्सला गुगल क्रोमचे ब्राउजर अपडेट मिळणा नाही तोवर बग डिटेल्स आणि लिंकच्या एक्सेसला प्रतिबंधित केले जाणार आहे.

गुगल क्रोमच्या ब्रॅकग्राउंडमध्ये ऑटोमेटिक अपडेट मिळतात. मात्र जर अपडेट आले नसेल तर युजरला मॅन्युअल पद्धतीने क्रोम अपडेट करावे लागणार आहे. यासाठी युजरला Google Chrome आणि नंतर About Google Chrome वर भेट द्यावी लागणार आहे. गुगल क्रोम डाउनलोड झाल्यानंतर ब्राउजर हे तुम्हाला रिलॉन्च करावे लागणार आहे. या पद्धतीने गुगल क्रोमच लेटेस्ट वर्जन पूर्णपणे इंस्टॉल होईल.