Mi Watch Revolve Active भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
Watch (Photo Credits-Twitter)

टेक्नॉलॉजी कंपनी शाओमीने आज 22 जून रोजी Mi Watch Revolve च्या अपग्रेडेड वर्जन Mi Watch Revolve Active स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहे. हे स्मार्टवॉच 14 दिवसांची बॅटरी लाइफसह येणार आहे. या मध्ये SpO2 सेंसर दिला आहे. जो रक्तातील ऑक्सिजनचा स्तर मॉनिटर करणार आहे. या व्यतिरिक्त एमआय वॉच रिवॉल्व अॅक्टिव्ह स्मार्टवॉचमध्ये कॉल-मेसेज नोटिफिकेशन, फ्लॅश लाइट आणि फाइंड माय फोन सारखे लेटेस्ट फिचर्स दिले आहेत.

Mi Watch Revolve Active स्मार्टवॉचचे डिझाअन एमआय वॉच रिवॉल्व सारखे आहे. यामध्ये उत्तम ग्रिपसाठी सिलिकॉनचे स्टेप दिले आहेत. तसेच कोविड19 ची परिस्थिती पाहता SpO2 सेंसर दिला आहे. हा सेंसर ब्लडमधील ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये स्लीप, हार्ट-रेट आणि स्ट्रेस लेव्हल ट्रॅकर मिळणार आहे. हे डिवाइस VO2 Max सेंसर लैस आहे.(Vivo Y12A स्मार्टफोन लॉन्च, Snapdragon 439 प्रोसेसरसह मिळणार 5000mAh ची बॅटरी)

कंपनीने Mi Watch Revolve Active स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन GPS सह 117 स्पोर्ट्स मोड दिले आहेत. ज्यामध्ये योगा आणि स्विमिंग सारख्या अॅक्टिव्हिटींचा समावेश आहे. तसेच 5 ATM रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हे वॉच वॉटरप्रुफ आहे. यामध्ये 1.39 इंचाचा ऑलवेज ऑन एमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 454x454 पिक्सल आहे. तसेच 110 वॉच फेस मिळणार आहेत. याचे वजन 32 ग्रॅम आहे.

एमआयच्या या स्मार्टवॉचची बॅटरी 14 दिवसांचा बॅकअप देणार आहे. तर लॉन्ग बॅटरी मोड 22 दिवसांची बॅटरी बॅकअप मिळणार आहे. या वॉचला एकूण फुल चार्ज होण्यास 2 तासांचा वेळ लागतो. या व्यतिरिक्त इन-बिल्ट एलेक्सा, स्टॉप वॉच, टाइमर, कॉल मेसेज नोटिफिकेशन, फ्लॅश लाइट आणि फाइंड माय फोन सारखे फिचर्स दिले जाणार आहेत.

Mi Watch Revolve Active स्मार्टवॉचची खरी किंमत 9,999 रुपये आहे. मात्र Early Bird ऑफर अंतर्गत फक्त 8,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे वॉच अॅमेझॉन इंडिया, कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोरवर Beige, Black, नेव्ही ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याचा पहिला सेल 25 जून पासून सुरु होणार आहे.