Vivo Smartphone Representative Image (फोटो सौजन्य-ट्वीटर)

स्मार्टफोन निर्माती कंपनी Vivo ने Y सीरिजचे नवे हेडसेट Vivo Y12A थायलंड मध्ये लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. त्याचसोबत यामध्ये मिड रेंजचा प्रोसेसर आणि एकूण तीन कॅमेरे दिले आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. तर जाणून घ्या विवो वाय12 ए स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनसह किंमतीबद्दल अधिक माहिती.(Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

विवो वाय12 ए स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाचा आयपीएस LCD एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेजॉल्यूशन 720X1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनसाठी क्वॉलकॉमच्या Snapdragon 439 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे.

कंपनीने विवो वाय21 ए स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये पहिला 13MP चा प्रायमरी सेंसर आणि दुसरा 2MP चा auxiliary लेन्स दिली आहे. तर फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास 5000mAh ची दिली आहे. याची बॅटरी 10W चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंग सपोर्ट करणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी डुअल सिम स्लॉट, 4G VoLTE, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी पोर्ट मिळणार आहे.(Vivo V21e 5G स्मार्टफोन भारतात पुढील आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता; पहा किंमत आणि वैशिष्ट्यं)

स्मार्टफोनची किंमत 4499 Bhat म्हणजेच 10,608 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रीन आणि ब्लू रंगाच्या ऑप्शनमध्ये येणार आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च केला जाणार याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही.  दरम्यान, कंपनीने नव्या वर्षाच्या सुरुवातीला Vivo Y20G स्मार्टफोन लॉन्च केला होता. याची किंमत 14,990 रुपये आहे. Vivo Y20G स्मार्टफोन FunTouch OS11 वर काम करणार आहे. यामध्ये 6.51 इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेजॉल्यूशन 1600X720 पिक्सल आहे.