Samsung Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Tab S7 FE (Photo Credits: Samsung)

सॅमसंगने (Samsung) गॅलेक्सी टॅब एस7 एफई (Galaxy Tab S7 FE) आणि गॅलेक्सी टॅब ए 7 लाइट (Galaxy Tab A7 Lite) भारतात लॉन्च केले आहेत. 23 जून पासून हे टॅबलेट्स भारतात खरेदीसाठी उपलब्ध होतील. Galaxy Tab S7 FE च्या 4जीबी+64जीबी वेरिएंटची किंमत 46,999 रुपये असून 6जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 50,999 रुपये इतकी आहे. तर गॅलेक्सी टॅब ए7 च्या 3जीबी+32जीबी वेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. वायफाय मॉडेलसाठी 11,999 रुपये आकारण्यात येतील. (Samsung Galaxy F41 स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळतोय 3 हजारांहून अधिक डिस्काउंट)

सध्याच्या काळात रिमोट वर्किंग आणि व्हर्च्युअल लर्निंग हे न्यू नॉर्मल झाले आहे. त्यामुळे आम्ही सॅमसंगचे क्रिएटीव्ही आणि टेक्निकली विकसित दोन नवे टॅबलेट Tab S7 FE आणि Tab A7 Lite विकसित केले आहेत. सध्याच्या काळात रिमोट वर्किंग आणि व्हर्च्युअल लर्निंग हे न्यू नॉर्मल झाले आहे. त्यामुळे आम्ही सॅमसंगचे क्रिएटीव्ही आणि टेक्निकली विकसित दोन नवे टॅबलेट Tab S7 FE आणि Tab A7 Lite विकसित केले आहेत, असे सॅमसंग इंडियाचे मोबाईल बिजनेसचे डिरेक्टर मधूर चर्तुवेदी यांनी म्हटले आहे. काम, अभ्यास आणि खेळण्यासाठी हे टॅबलेट्स उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.

Samsung Galaxy Tab S7 FE (Photo Credits: Samsung)

Galaxy Tab S7 FE  यात 12.4 इंचाचा लार्ज डिस्प्ले देण्यात आला असून 16:10 आस्पेक्ट रेशो आहे. 244 पिक्सलचा पर इंच रिज्योल्यूशन देण्यात आलं आहे. Galaxy Tab S7 FE मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G चा प्रोसेसर देण्यात आला आहे. 8MP चा रिअर कॅमेरा आणि 5MP चा लँडस्केप मोड कॅमेरा व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.

Galaxy Tab A7 Lite  मध्ये immersive display आणि  powerful dual speakers देण्यात आले आहेत. 32 जीबीचा इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येईल. तसंच यात 1.8GHz octa-core MediaTek Helio P22T प्रोसेसर देण्यात आला आहे. Galaxy Tab A7 Lite ला 8MP चा रिअर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Galaxy Tab S7 FE हा mystic black, mystic silver, mystic green and mystic pink या चार रंगात उपलब्ध आहे. Galaxy Tab A7 Lite हा ग्रे आणि सिल्वर या दोन रंगात उपलब्ध होईल.