Samsung Galaxy F41 स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळतोय 3 हजारांहून अधिक डिस्काउंट
Samsung Galaxy F41 | (Photo Credits: Samsung /Twitter)

जर तुम्ही नवा जंम्बो बॅटरी असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण सॅमसंग कंपनीचा Galaxy F41 स्मार्टफोन खरेदी करण्याचा तुम्ही नक्की विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला 6,000 mAh च्या बॅटरीसह शानदार कॅमेरा आणि एचडी डिस्प्ले मिळणार आहे. तुम्ही फोन ई-कॉमर्स वेबसाइट प्लिपकार्टवर सुरु असलेल्या इलेक्ट्रॉनिक सेल दरम्यान अत्यंत कमी किंमतीत खरेदी करु शकता. तर जाणून घ्या सॅमसंग गॅलेक्सी एफ41 च्या किंमतीसह त्यावर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल अधिक.

सॅमसंग गॅलेक्सी एफ41 6GB+64GB स्टोरेज आणि 6GB+128GB स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध आहे.याच्या 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,499 रुपये आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 17,999 रुपये आहे. सध्या फ्लिपकार्ट सेलवर सध्या या दोन्ही वेरियंटवर 3500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे याची किंमत क्रमश: 12,999 रुपये आणि 14,999 रुपये आहे. या व्यतिरिक्त HDFC बँकेच्या कार्डचा उपयोग करुन गॅलेक्सी एफ41 च्या 64GB मॉडेल 12,249 रुपये आणि 128GB मॉडेल 13,749 रुपयांत खरेदी करता येणार आहे. त्यानुसार 4250 रुपये सेव्ह करता येणार आहे.

कंपनीचा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10OS वर काम करतो आणि यामध्ये Exynos 9611 चिपसेट वर उतरवला आहे. यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड Infinity-U डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये दिला गेलेला स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.(Realme ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक)

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी सेंसर 64MP चा आहे. तर यामध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP चा सेंसर दिला गेला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची दमदार बॅटरी दिली गेली आहे.