Realme कडून भारतात सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. रिअलमी 8 5G स्मार्टफोन नव्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. याची किंमत 13,999 रुपये आहे. रिअलमी 8 5जी चा बेस वेरियंट भारतात येणारा सर्वाधिक स्वस्त 5जी स्मार्टफोन असणार आहे. या फोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट येथे होणार आहे. यापूर्वी रिअलमी 8 5जी हा 4 GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उतरवण्यात आला होता. त्याची किंमत बेस वेरियंटपेक्षा 1 हजार रुपयांनी अधिक आहे.
रिअलमी 8 5G च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत भारतात 13,999 रुपये आहे. तर रिअलमी 8 5G च्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे.(Realme 8 च्या किंमतीत झाली घट, 64MP कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची 'ही' आहे नवी किंमत)
Tweet:
Seamless fun with #realmeUI 2.0 on #realme85G. Customized for Gen Z. pic.twitter.com/f5DKInrZbf
— realme (@realmeglobal) May 14, 2021
Realme 8 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. प्रोसेसरच्या आधारावर फोनमध्ये Dimensity 700 5G चा वापर केला आहे. फोनमध्ये वर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. त्याच्या मदतीने 4GB रॅम आणि 5GB आणि 8GB रॅम हा 11GB रॅममध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे. हा अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड Realme UI 2.0 वर काम करणार आहे. Realme 8 5G स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोन 5 नाइट प्रायमरी कॅमेरा 48MP चा प्रायमरी कॅमेरासह 16MP कॅमेरा दिला गेला आहे. फोनला साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिला आहे. पॉवरबॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी दिली असून ती 18W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येणार आहे.