भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिट बुकिंग वेबसाईट्स IRCTC मध्ये मोठा बदल होणार आहे. या नव्या बदलावानंतर IRCTC च्या वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून तिकिट बुकिंग करतेवेळी नवा अनुभव मिळणार आहे. भारतीय रेल्वेने अधिकृत ऑनलाईन तिकिट बुकिंग सिस्टम पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट पासून हा बदल पहायला मिळणार आहे. प्रवाशांना सोईस्करित्या तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी आयआरसीटीसी यांनी हा बदल केला आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी आर्टिफिशिअल इंडेलिजेंस (AI) सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. या टेक्नीकल अपग्रेड नंतर आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिट बुकिंग पुर्वीपेक्षा सोपी होणार आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी के यादव यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. नवी तिकिट सिस्टिम पुढील महिन्यापासून रोलआउट करण्यात येणार आहे. तर कोरोना व्हायरसमुळे काही निवडक पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात आहेत. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी हे नवे फिचर आणले आहे. त्यामुळे नागरिकांना ट्रेन आणि तिकिट संदर्भातील संपूर्ण माहिती योग्य रितीने प्राप्त होणार आहे. (TRAI चे ब्रॉडकास्टर्सला आदेश, येत्या 10 ऑगस्ट पर्यंत लागू होणार NTO 2.0)
कोरोना व्हायरसच्या कारणामुळे लोक डिजिटल आणि कॉन्टेक्टलेस सुविधांचा वापर करत आहे. रेल्वे बोर्डाच्या मते सध्या देशात 85 टक्क्यांहून अधिक प्रवासी तिकिट बुकिंग करत आहेत. रेल्वेने कॉन्टेक्ट लैस तिकिटिंगला चालना देण्यासाठी QR कोड सिस्टिम लागू करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड सॉल्यूशनच्या माध्यमातून प्रवासी स्टेशन आणि ट्रेनमध्ये आपले तिकिट मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन केल्यानंतर प्रवास करु शकणार आहेत. भारतीय रेल्वेने याची सुरुवात मुंबई लोकल पासून केली आहे. (Upsend File Sharing App: Xender, SHAREit ला टक्कर देतोय शुभम अग्रवाल या तरुणाचा मेड इन इंडिया अपसेंड ऍप; जाणुन घ्या फीचर्स Watch Video)
या व्यतिरिक्त भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांमध्ये ही अपग्रेड करत प्रमुख रेल्वे स्थानकावर एअरपोर्ट सारखी सुविधा पहायला मिळणार आहे. नव्या तिकिट सिस्टिमच्या माध्यमातून तिकिट बुकिंग केल्यास प्रवाशाला QR कोडची URL मिळणार आहे. हा कोड प्रवाशांना SMS च्या
माध्यमातून मिळणार आहे. प्रवासी ज्या वेळी रेल्वे स्थानकात एन्ट्री केल्यानंतर त्यावेळी कोडचा वापर करुन चेकिंग करावे लागणार आहे.