Upsend File Sharing App: Xender, SHAREit ला टक्कर देतोय शुभम अग्रवाल या तरुणाचा मेड इन इंडिया अपसेंड ऍप; जाणुन घ्या फीचर्स  (Watch Video)
Upsend File Sharing App Made In India (Photo Credits: Google Play Store)

Upsend File Sharing Mobile App: केंद्र सरकार तर्फे चीनच्या तब्बल 59 ऍप्लिकेशन वर बंदी (Chinese Products Ban) आणल्यानंतर सर्वत्र मेड इन इंडिया (Made In India)  उत्पादनांचीच चर्चा आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्होकल द लोकल (Vocal The Local) ची घोषणा केल्यापासून अनेक बाबीत स्थानिक तरुणांचे काम आता पुढे येऊ लागले आहे. विशेषतः तंत्रज्ञानात अनेकांना प्रोत्साहन मिळत आहे.असाच एक मोबाईल ऍप सध्या गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर चर्चेत आहे. 'अपसेंड' असे या फाईल शेअरिंग ऍप (Upsend File Sharing App) चे नाव असून अवघ्या काहीच दिवसात त्याला 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेलेय. बिहारच्या मुझ्झफरपूर येथील रहिवाशी शुभम अग्रवाल या तरुणाने बनवलेला हा ऍप संपूर्णतः एक भारतीय उत्पादन आहे.  गूगल प्ले स्टोअर वर या ऍप ला सध्या 4. 8 इतकं रेटिंग आहे.काय आहे हा ऍप आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हे ही वाचा - TikTok Banned: टिकटॉक बॅन होताच भारतीयांंना Chingari App देणार व्हिडीओ शेअरिंग ला प्लॅटफॉर्म, या Made In India ऍप विषयी जाणून घ्या सविस्तर

अपसेंड ऍप हा शेअर इट किंवा Xender या सारख्या ऍप्लिकेशन्स प्रमाणेच काम करतो. यामार्फत आपण अन्य ऍप्स, गेम्स, व्हिडिओज, फोटोज, फाईल्स अन्य मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर शेअर करू शकता. या अॅपची विशेषतः म्हणजे हे काम इंटरनेटशिवाय पूर्ण होते त्यामुळे आपल्याला फाईल शेअर करताना डेटा वाया जाण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा ऍप वापरून आपण कोणत्याही प्रकारची फाईल अन्य Android डिव्हाइस तसेच आपल्या पीसी, जिओफोन किंवा मॅक सोबत शेअर करू शकता.  India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी

Upsend File Sharing App (Watch Video)

दरम्यान, या ऍप चा निर्माता शुभम अग्रवाल हा बिहार येथे आयुर्वेदिक औषधांचे दुकान चालवणारा एक तरुण आहे. शुभम हा वेबसाईट आणि ऍप डेव्हलपमेंट शिकत असताना त्याच ज्ञानातून त्याने हा ऍप तयार केलाय. शुभमने 9  जून 2020 ला हा ऍप लाँच करताच महिना उलटायच्या आत त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. गूगल प्ले स्टोअर वर या ऍप्स रिव्ह्यूज उत्तम आहेत. तुम्हीही आवश्य तपासून पहा.