Chingari Video App is an alternative to China's TikTok (Photo Credits: Play Store)

केंद्र सरकार तर्फे काल, 29 जून रोजी टिकटॉक (TikTok) या प्रसिद्ध ऍप सह तब्बल 59 चीनी ऍप बॅन करण्यात आले. आज टिकटॉक गूगल प्ले स्टोअर (Google  आणि ऍपल स्टोअर मधून सुद्धा काढून टाकण्यात आला आहे. टिकटॉकची भारतातील प्रसिद्धी पाहता अनेकांना सरकारच्या या निर्णयाचे दुःख झाले असणार यात काही शंका नाही. पण या मंडळींसाठी आता एक नवा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे हा पर्याय पूर्णपणे मेड इन इंडिया (Made In India) आहे. हा पर्याय म्हणजे Chingari App. या ऍप ला आतापर्यंत 25 लाख वेळ डाउनलोड करण्यात आले आहे, ज्यातील 6 लाख डाऊनलोड्स तर अवघ्या दहा दिवसातील आहेत. या व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म वर टिकटॉक प्रमाणेच अनेक इंटरेस्टिंग फीचर्स आहेत. गूगल प्ले स्टोअर वर या ऍप ला 5  पैकी 4.7 स्टार्स आहेत, चला तर मग काय आहे हा ऍप आणि त्याचे फीचर्स सर्व काही सविस्तर जाणून घेऊयात.  India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी

चिंगारी ऍपवरून पैसे कमावण्याची सुद्धा चांगली संधी उपलब्ध आहे. म्हणजेच, VMate या ऍप प्रमाणेच इथे तुमचा व्हिडीओ किती व्हायरल होतो यानुसार पॉईंट्स दिले जातात जे वापरून आपण पैसे मिळवू शकता.

चिंगारी ऍप Video

चिंगारी ऍप हा इंग्रजी, मराठी, हिंदी, तामिळ,तेलगू, पंजाबी, मल्याळम, कन्न, बांग्ला या भाषांमध्ये कंटेंट पाहण्याची आणि बनवण्यासाठी पर्याय देतो. ऍप्लिकेशन सुरु केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला या भाषा निवडता येतात. यानंतर थेट एक नवी विंडो सुरु होते, ज्यात आपल्याला न्यूज, गेम्स, आणि व्हिडीओ असे पर्याय दिसतात, तसेच वरील बाजूस Quizz चा पर्याय सुद्धा दिसतो. चिंगारी ऍप वर केवळ एका टॅप मध्ये व्हिडीओज Whatsapp वर शेअर करता येतात.