TRAI चे ब्रॉडकास्टर्सला आदेश, येत्या 10 ऑगस्ट पर्यंत लागू होणार NTO 2.0
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI यांनी नुकत्याच NTA 2.0 येत्या 10 ऑगस्ट पर्यंत लागू करण्याचे निर्देशन दिले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात ट्राय यांनी टेलिकॉम ऑपरेटर्सना नव्या NTA 2.0 (नॅशनल टैरिफ ऑर्डर) रोलआउट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर Airtel, Tata Sky, Dish TV सह अन्य डिटीएच सर्विस प्रोव्हाइडर्स यांना नव्या टैरिफ ऑर्डर अंतर्गत युजर्सला चॅनल ऑफर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता नव्या टैरिफ ऑर्डर अंतर्गत चॅनल सर्विस प्रोव्हाइडर्स यांना त्यांच्या बुके पॅकचे दर नव्या टॅरिफ ऑर्डर नुसार करावे लागणार आहेत.

गेल्या शुक्रवारी ट्राय यांनी सर्व ब्रॉडकास्टर्स यांना नव्या टैरिफ ऑर्डर अंतर्गत युजर्सला त्यांचे चॅनल्स ऑफर करावेत आणि NTA 2.0 अंतर्गत सर्व तरतुदी 10 ऑगस्ट पर्यंत लागू करावेत. नव्या टैरिफ ऑर्डरनुसार ब्रॉडकास्टर्स यांनी त्यांचे चॅनल्स कमीतकमी दर, बुके आणि इंटरकनेक्टेड ऑफर्स पब्लिश करण्याचे निर्देशन दिले आहेत. त्यामुळे युजर्सला चॅनल्सचे सब्सक्राइब करणे सोप्पे होईल. ट्रायने सर्व ब्रॉडकास्टर्स यांना आदेश दिले आहेत की. त्यांच्या चॅनल्सचे दर, इंटरकनेक्ट पॅक्स किंवा ऑफर आणि बुके संदर्भातील माहिती त्यांच्या संकेतस्थळावर किंवा पब्लिक डोमेन येथे जाहीर करावेत. (Netflix कडून सुपर ऑफर! 'The Old Guard' गेम जिंकल्यावर 83 वर्षांसाठी फ्री सब्सक्रिप्शन)

दरम्यान, 1 जानेवारी 2020 रोजी डीटीएच, केबल ऑपरेटर्स आणि NTA 2.0 जारी केले होते. ट्राय यांनी ब्रॉडकास्टर्सवर नाराजी दाखवत असे म्हटले होते की, NTA 1.0 अंतर्गत येणारे स्वस्त बुके 1 ऑगस्ट पासून नियमाक न सांगता Discontinued करत असून महागडे बुके पब्लिश केले जात आहेत. तसेच नियमाक यांनी असे ही म्हटले होते की, NTA 1.0 च्या नियमांच्या विरुद्ध आहेत.

नियमाक यांनी असा ही दावा केला आहे की, काही डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (DPOs) यांनी याबाबत नियमाक यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे. त्यानुसार ब्रॉडकास्टर्स NTA 2.0 अंतर्गत RIO (रेफरेंन्स इन्टरकनेक्टड ऑफर्स) जारी केले नाहीत. या कारणामुळे काही DPO नवे अॅग्रिमेंट्ससाठी ब्रॉडकास्टर्ससह तयार नाहीत. हे इंडस्ट्रीसाठी नुकसानदायक ठरु शकते.