Representational Image (Photo Credits: unsplash.com)

मनोरंजन करण्यासाठी नेटफ्लिक्स (Netflix) हे तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले माध्यम आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात तर याची लोकप्रियता अधिकच वाढली. गेल्या काही महिन्यात अनेक नवे शोज या लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले. अलिकडेच नेटफ्लिक्सने 17 नवे सिनेमे आणि वेबसिरीज युजर्ससाठी आणत असल्याची घोषणा केली. आता युजर्ससाठी अजून एक एक्सायटिंग ऑफर नेटफिक्सने आणली आहे, एका भाग्यवान विजेत्याला नेटफ्लिक्सचे लाईफटाईम सब्सक्रिप्शन मोफत देण्यात येणार आहे. म्हणेजच 1000 महिने अर्थात 83 वर्ष. हे फ्री सब्सक्रिप्शन (Free Subscription) The Old Guard Game खेळल्यानंतर मिळणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर केवळ अमेरिकेतील युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (द कारगिल गर्ल' सह 'हे' मोठे चित्रपट देखील नेटफ्लिक्स वर होणार प्रदर्शित; येथे पाहा पूर्ण यादी)

काय आहे The Old Guard गेम?

नेटफ्लिक्सचा हा गेम The Old Guard या अॅक्शन थ्रिलर मुव्हीवर आधारीत आहे. रिपोर्टनुसार, हा एक जून्या काळातील immortals ग्रुपचा गेम आहे. ज्यामध्ये ग्रुपमधील लोकांना स्वतःला बरे करण्याची ताकद असते आणि त्या लोकांना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढायचे असते.

Free Subscription कसे मिळवाल?

Free Subscription मिळवण्यासाठी तुम्हाला हा गेम खेळावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तो सिनेमा पाहावा लागेल. कारण हा गेम सिनेमावर आधारित आहे. सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही हा गेम अगदी सहज खेळू शकता. कम्य्पुटर, मोबाईल या कशावरही तुम्ही हा गेम खेळू शकता. नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा 17 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुरु झाली आहे.

# मोबाईल किंवा कॅम्प्युटर मधून oldguardgame.com या वेबसाईटला भेट द्या.

# ‘Play Now’ बटणावर क्लिक करुन स्क्रिनवर असलेला रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.

# गेम सुरु होईल.

# गेम खेळण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

# नेटफ्लिक्सचे नियम जाणून घेण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी येथे क्लिक करा.

The Old Guard या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळत आहे. अवघ्या चार आठवड्यात 7 कोटी लोकांनी हा सिनेमा पाहिला आहे. या गेममध्ये सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या युजरला विजेता घोषित करण्यात येईल आणि त्याला नेटफ्लिक्सचे 83 वर्षांचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.