Jhanvi Kapoor and Bobby Deol (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले अनेक चित्रपट रखडले आहेत. यामुळे OTT च्या माध्यमातून अनेक चित्रपट प्रदर्शित होत असताना दिसत आहे. यात आता जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' (Gunjan Saxena: The Kargil Girl)नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाणार आहे. पुढील महिन्यात 12 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. त्यासोबतच अनेक चित्रपट OTT प्लेटफॉर्मच्या माध्यमातून प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

जान्हवी कपूर ने इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करुन आपल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'च्या OTT प्लॅटफॉर्मवरील रिलीजमुळे कुटुंबिय नाराज? पाहा काय म्हणाला सुशांतचा भाऊ

यासोबतच नेटफ्लिक्सवर अन्य बरेच मोठे आणि महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात संजय दत्त ची 'तोरबाज', कोंकना सेन शर्मा-भूमि पेडनेकर ची 'डॉली किटी और वो चमकते सितारे', राधिका आपटे-नवाजुद्दीन सिद्दीकी ची 'रात अकेली है', अनुराग बासु ची मल्टी-स्टारर फिल्म 'लूडो', बॉबी देओल ची 'क्लास ऑफ 83', 'यामी गौतम-विक्रांत मेस्सी ची 'गिन्नी वेड्स सनी', 'तब्बू आणि ईशान खट्टर ची 'ए सूटेबल बॉय', प्राजक्ता कोहली ची 'मिसमैच्ड', अनिल कपूर-अनुराग कश्यप ची 'एके वर्सेज एके', 'नवाजुद्दीन सिद्दीकी ची 'सीरियस मेन',काजोल-मिथिला पालकर ची 'त्रिभंगा', शबाना आजमी ची 'काली कूही', 'बॉम्बे बोस', 'भाग बीनी भाग', पूजा भट्ट की 'बॉम्बे बिगिंस' आणि मसाबा गुप्ता की 'मसाबा मसाबा' यांचा समावेश आहे.

नेटफ्लिक्स ने एक प्रोमो व्हिडिओ च्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यावर सर्व चित्रपटांची घोषणा त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.