बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) ऑनलाईन प्रदर्शित (Online Release) होणार आहे. अलिकडेच सिनेमाचे पोस्टर शेअर करत 24 जुलै 2020 रोजी हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडिया माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी डिज्नी इंडियाने हा सिनेमा फ्री दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिज्नी प्लस हॉटस्टारवर दिल बेचारा हा सिनेमा चाहत्यांसह सर्वांना पाहता येणार आहे. परंतु, या निर्णयामुळे सुशांतचे कुटुंबिय नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. (सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ अभिनेत्री रुपा गांगुली यांचे खळबळजनक वक्तव्य)
सुशांतचा भाऊ (Cousin) यांनी आपली नाराजी एबीपी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. ऑनलाईन रिलीज ऐवजी सुशांतचा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे 'दिल बेचारा'च्या ऑनलाईन रिलीजमुळे कुटुंबिय नाखुश आहेत. सुशांतचा सिनेमा ऑनलाईन रिलीज ऐवजी 70 एमएम स्क्रिनवर रिलीज करण्यात यावा, अशी कुटुंबियांची इच्छा आहे. तसंच सिनेमे ओटीटी प्लेटफॉर्म्सवर नाही तर सिनेमागृहात प्रदर्शित व्हावे यासाठी सुशांत काम करत होता, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
Sanjana Sanghi Post:
पुढे सुशांतचा भाऊ म्हणाला, "सुशांतला श्रद्धांजली द्यायची असेल तर सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करा. त्यामुळे सर्व लोकांना तो पाहता येईल. आम्ही हा सिनेमा थिएटरमध्येच पाहू इच्छितो दुसरं कुठेही नाही."
'दिल बेचारा' या सिनेमात अभिनेत्री संजना संघी सुशांतसह प्रमुख भूमिकेत आहे. या अभिनेत्री सोशल मीडियावर एक व्हाईस नोट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले होते, "सिनेमा मोठ्या पडद्यावर किंवा ऑनलाईन रिलीज केला जाऊदे. या वादात, चर्चेत तुम्ही पडू नका. सिनेमात कोणत्याही माध्यमातून प्रदर्शित झाला तरी सुशांतच्या या सिनेमाला भरपूर प्रेम द्या."