सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ अभिनेत्री रुपा गांगुली यांचे खळबळजनक वक्तव्य
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जून रोजी वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंब, चाहते, मित्रपरिवार या सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.  त्यानंतर सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री रुपा गांगुली (Rupa Ganguly) यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. सुशांतचे इंस्टाग्राम अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत होते. तसेच त्याच्या आत्महत्येसंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे वृत्त आयएएनएसने दिले आहे.

सुशांतच्या सोशल मिडिया अकाउंटवरून काही गोष्टी ऍड आणि डिलीट होत आहेत. त्याचे अकाउंट कोणीतरी वापरत आहे. याआधी मला विश्वास नव्हता. परतु, मी स्वत: स्कीनशॉर्ट पाहिले आहेत. त्याचे अकाऊंट कोण हाताळत आहे? पोलीस की इतर कोणी? सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करणार का?” असे प्रश्न रुपा गांगुली यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून उपस्थित केले आहेत. महत्वाचे म्हणजे, या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅग केले आहे. हे देखील वाचा- राजकुमार राव करणार 'दिल बेचारा' या सुशांत सिंह राजपूत याच्या अखेरच्या सिनेमाचे प्रमोशन

आयएएनएसचे ट्वीट-

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजम हा वाद अगदी चव्हाट्यावर आला आहे. यामुळे सध्या सुशांतच्या चाहत्यांमध्ये रोष जाणवत असून एक प्रकारची क्रांतीची लहर सर्वत्र दिसत आहे. सुशांतचा दिल बेचारा हा चित्रपट 8 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, देशात कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा दिल बेचारा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करावे, अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी निर्मात्यांकडे केली होती.