राजकुमार राव करणार 'दिल बेचारा' या सुशांत सिंह राजपूत याच्या अखेरच्या सिनेमाचे प्रमोशन

सुशांतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचरा' हा 24 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर अभिनेता राजकुमार राव याने सिनेमाच्या प्रोमोशनची जबाबदारी स्वतः उचलत असल्याचे सांगितले.

राजकुमार राव करणार 'दिल बेचारा' या सुशांत सिंह राजपूत याच्या अखेरच्या सिनेमाचे प्रमोशन
Rajkummar Rao and Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या अकाली एक्झिटनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सुशांतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara) हा 24 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होणार असल्याचे कालच (25 जून) जाहीर करण्यात आले. त्यानंतर अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याने इंस्टाग्रामवर 'दिल बेचरा' सिनेमाचे पोस्टर हार्ट इमोजीसह शेअर केले आहे. राजकुमार राव याने सुशांतच्या अखेरच्या सिनेमाच्या प्रोमोशनची जबाबदारी स्वतः उचलली आहे. (सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' अखेर OTT प्लॅटफॉर्मवरच होणार प्रदर्शित, 'या' तारखेला होणार रिलीज)

सुशांतची डेब्यू फिल्म 'काय पो छे' आणि 'राब्ता' या सिनेमात राजकुमार राव याने सुशांत सोबत एकत्र काम केले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर "भावा, तुझी खूप आठवण येईल," अशी भावूक पोस्ट राजकुमार राव याने केली होती. (सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्या; सलमान खान याचे आपल्या फॅन्सना आवाहन, View Tweet)

 RajKummar Rao Post:

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) on

'दिल बेचारा' हा सिनेमा जॉन ग्रीनच्या कादंबरीवर आधारीत असून यात सुशांत सह संजना संघी ही अभिनेत्री झळकणार आहे. या सिनेमात सैल अली खान याची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सुशांतचा अखेरचा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याने चाहते काहीसे नाराज आहे. त्यामुळे सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित करण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2020 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).