Dil Bechara (Photo Credit: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आत्महत्येचे पाऊल उचलून अचानक झालेली सुशांतची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. त्याने हे पाऊल का उचलले हे अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. त्यामुळे त्याच्या आठवणी सांभाळून ठेवण्यासाठी त्याच्या चाहत्यांची धडपड सुरुच आहे. अशा परिस्थिती सुशांतने केलेला शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) मोठ्या पडद्यावर पाहण्याचे स्वप्न होते. मात्र आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh)याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

येत्या 24 जुलै ला सुशांतचा 'दिल बेचारा' चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे. डिजनी प्लस हॉटस्टार (Disney Plus hotstar)हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे. Dil Bechara On Big Screen: सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' चित्रपटगृहात प्रदर्शित करा; चाहत्यांची निर्मात्यांकडे मागणी

पाहा ट्विट:

तसेच हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन नसलेल्या प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.

सुशांतच्या निधनानंतर सुशांतची शेवटी आठवण म्हणून त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करावा अशी मागणी चाहत्याकडून केली जात होती. पण आता अखेर हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.