बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंह याने अनेक चित्रपटात अप्रतिम कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर सुशांतचा दिल बेचारा (Dil Bechara) हा चित्रपट 8 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, देशात कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा दिल बेचारा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करावे, अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी निर्मात्यांकडे केली आहे. यामुळे ट्विटरवर 'दिल बेचारा ऑन बिग स्क्रिन' हा टॅग ट्रेन्ड होत आहे. यावर प्रेक्षकांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. परंतू, गेल्या रविवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहली आहे. नैराश्य आल्याने त्याने त्याचे आयुष्य संपवले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला होता. सोमवारी दुपार दरम्यान त्याच्या मृतदेहावर मुंबईच्या विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput's Demise: सुशांत सिंह राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ
ट्वीट-
We want to see #DilBecharaOnBigScreen please don't release in OTT ....how long it takes doesn't matter we'll will for this movie #RIPSushantSingRajput pic.twitter.com/cVnhIUOIZj
— ᴀᴅɪᴛyᴀ - ꜱʀɪᴠᴀꜱᴛᴀᴠ 🚭 HBD - Yogesh and Aritra ❤️🙏 (@AdityaS_Indian) June 16, 2020
ट्विट-
This Man @itsSSR Deserved much More But Now Only One Thing You Guys Can Make It As The Last Due Respect To Him Would Be Releasing his Last movie #DilBecharaOnBigScreen @CastingChhabra @foxstarhindi He Always Wanted his movies to be enjoyed in Theaters plss for us for him 🙏 pic.twitter.com/0hIIpw7ipY
— ViNuShaNkeR_AjiThA (@Vinuv143) June 16, 2020
ट्वीट-
We know as they say..After death the Movie world will continue and replace #SushantSinghRajput so easily..But his family will be left dealing with this trauma..
At least give them one last time to see their son, in What he Loved Cinema, in big screen.#DilBecharaOnBigScreen pic.twitter.com/jFYdtbPc28
— 🅽🅰🅸🅼🅰 🆂🅷🅴🅽💞💞 (@naima_shen) June 16, 2020
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होत.