How To Block Your Stolen Smartphone: तुमचा चोरी गेलेला स्मार्टफोन 'या' पद्धतीने ताबडतोब करा ब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Representational Image (Photo Credit: pixabay)

How To Block Your Stolen Smartphone: तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या बजेटनुसार मोबाईल फोन खरेदी करतो. परंतु, आपला मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास आपणास केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर आपली गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येते. सध्या मोबाईल फोनचा डेटा वापरुन बर्‍याच प्रकारचे फ्रॉड केले जातात. तसेच अनेक गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता असते. ज्यामुळे आपल्याला जेलमध्येदेखील जावं लागू शकतं. अशा परिस्थितीत, आपला मोबाइल फोन चोरीला गेला असेल, तर आपला मोबाइल फोन त्वरित ब्लॉक करा. त्यामुळे आपला हरवलेला फोन दुसरं कोणीही वापरू शकणार नाही. तसेच, तुमचा चोरी गेलेला फोन त्या चोराला विकतादेखील येणार नाही. कारण, त्या फोनमध्ये कोणतेही नेटवर्क सर्पोट करणार नाही. (हेही वाचा - व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच येत आहे अ‍ॅनिमेटेड 'Baby Shark' स्टिकर फिचर्स; जाणून घ्या 'कसा' करता येणार वापर)

असा करा मोबाईल फोन ब्लॉक -

  • जर तुमचा मोबाइल फोन चोरीला गेला असेल, तर आपण प्रथम पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविला पाहिजे. मोबाईल चोरीचा अहवाल ऑनलाईन तसेच ऑफलाइनही दाखल केला जाऊ शकतो. तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारदाराने एफआयआर व तक्रार क्रमांकाची प्रत घ्यावी.

    याशिवाय सेंट्रल इक्विपमेंट आईडेंटिटी रजिस्टर (CEIR) च्या ceir.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी. सीईआयआरकडे फोन मॉडेल, सिम आणि आयएमईआय नंबर सारख्या देशातील प्रत्येक मोबाइल फोनचा डेटा आहे. ज्याच्या मदतीने चोरी गेलेला मोबाइल शोधला जातो. तसेच मोबाइल ब्लॉक आणि अनलॉक केला जाऊ शकतो. (हेही वाचा - Micromax's In Series Specifications: मायक्रोमॅक्स इन सिरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; 2 नोव्हेंबरला होऊ शकतो लाँच)

  • Ceir.gov.in वर क्लिक केल्यावर तुम्हाला Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile असे तीन पर्याय दिसतील. यानंतर, चोरी केलेला फोन ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला Stolen/Lost Mobile पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक पेज उघडे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या मोबाइलचा तपशील द्यावा लागेल.
  • मोबाईल तपशिलाच्या रूपात, मोबाईल नंबर, आयएमईआय नंबर, डिव्हाइस ब्रँड, कंपनी, फोन खरेदी करण्यासाठी इनव्हॉइस, हरवलेल्या फोनची तारीख नोंदवावी लागेल. याशिवाय फोन, चोरीचे राज्य, जिल्हा, मोबाईल तपशील, तक्रार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याशिवाय पोलिसांच्या तक्रारीची प्रत अपलोड करावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर तो अपलोड करावे लागेल.
  • या सर्व प्रक्रियेनंतर Add more complaint तक्रारीवर क्लिक करा. यात तुम्हाला मोबाइल मालकाचे नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळखचा तपशील द्यावा लागेल. तसेच यात तुम्हाला तुमचा मोबाइल नंबरदेखील द्यावा लागेल.

यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी दिला जाईल. त्या आधारे तुमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे वरील सर्व तपशील सबमिट केल्यानंतर तुमचा फोन ब्लॉक केला जाईल. तसेच जर आपल्यास फोनबद्दल काही माहिती मिळाली, तर ती वापरकर्त्यांनादेखील पाठविली जाईल. अशा पद्धतीने तुम्ही आपला हरवलेल्या स्मार्टफोन ब्लॉक करू शकता.