Micromax's In Series Specifications: मायक्रोमॅक्स इन सिरीजचे स्पेसिफिकेशन्स लीक; 2 नोव्हेंबरला होऊ शकतो लाँच
Representational Image (Photo Credit: PTI)

Micromax's In Series Specifications: मायक्रोमॅक्स (Micromax) ने पुन्हा एकदा ब्रँड-न्यू इन सिरीजसह भारतीय स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या सिरीजअंतर्गत कोणते फोन लाँच केले जातील हे अद्याप कंपनी सांगितलेले नाही. मायक्रोमॅक्सच्या या मालिकेत दोन फोन बाजारात आणण्यात येणार असल्याचे एका नवीन अहवालात समोर आले आहे. TheMobileIndian च्या वृत्तानुसार, मायक्रोमॅक्स फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसर असणार आहे. या हँडसेटमध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले असणार आहे. या फोनचे दोन व्हेरियट 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोअरेज आणि 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. या मायक्रोमॅक्स फोनमध्ये 5000mAh बॅटरी असणार आहे.

या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर स्टॉक अँड्रॉईडवर चालेल. 2 जीबी रॅमच्या व्हेरिएंटमध्ये फोटो काढण्यासाठी हँडसेटमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे सेन्सर असतील. फोनमध्ये पुढच्या बाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. (हेही वाचा - Flipkart Big Billion Days Sale: फ्लिपकार्ट 'बिग बिलियन डेज' सेल मध्ये 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील 'हे' सर्वोत्कृष्ट TV; जाणून घ्या खास ऑफर्स)

याशिवाय 3 जीबी रॅम व्हेरियंटमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात येणार आहेत. या इन-सीरिज फोनमध्ये 13 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सेल तीन सेंसर असतील. तसेच सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे. अहवालानुसार, मायक्रोमॅक्सच्या या मालिकेच्या सुरुवातीच्या फोनची किंमत 7 हजार ते 15 हजार रुपयांदरम्यान असेल. या हँडसेटच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. परंतु, अहवालानुसार, नवीन मालिका 2 नोव्हेंबरला लाँच केली जाऊ शकते.

दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या लीकमध्ये इन-सीरिज स्मार्टफोन 7 हजार ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान लाँच केला जाईल, असा दावा करणयात आला होता. मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी ट्विटरवर 2 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करुन मायक्रोमॅक्सचा स्मार्टफोन बाजारात परत आल्याची माहिती दिली होती.