Flipkart Big Billion Days Sale: फ्लिपकार्ट 'बिग बिलियन डेज' सेल मध्ये 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील 'हे' सर्वोत्कृष्ट TV; जाणून घ्या खास ऑफर्स
TV Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Flipkart Big Billion Days Sale: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचा आज दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टेलिव्हिजन, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. याशिवाय वस्तूंच्या खरेदी एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केल्यास 10% डिस्काऊंटदेखील देण्यात येत आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये फ्लिपकार्ट 48 तासात इंस्टॉलेशन, 3 पट चांगले एक्सचेंज व्हॅल्यू आणि नो कॉस्ट ईएमआय देत आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या नोकिया, रियलमी, सॅमसंग, पॅनासोनिक, एलजी आणि वनप्लस स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत. या टिव्हीवर तुम्हाला उत्तम ऑफर दिल्या जात आहेत. चला तर मग जाणून घेऊयात खास ऑफर्स...(हेही वाचा - Flipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल मध्ये 'या' हेडफोन्स आणि स्पीकर्स वर मिळतोय जबरदस्त Discount)

LG 32-इंचाचा HD टीव्ही -

एलजीचा 32 इंचाचा HD Ready TV 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घेता येतो. टीव्हीला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + होस्टर आणि यूट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीचा स्क्रीन रीफ्रेश दर 50 हर्ट्झ आहे. टीव्हीची एमआरपी 21,990 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तो केवळ 13,049 रुपयांमध्ये घेता येऊ शकतो.  (वाचा - Samsung कंपनीची Reward Yourself ऑफर, लेटेस्ट स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना मिळणार संधी)

सॅमसंग 32 इंचाचा एचडी टीव्ही -

सॅमसंगचा 32 इंचाचा HD Ready स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सवलतीच्या दरात मिळू शकतो. या टीव्हीमध्ये स्क्रीन मिरर, कॉन्टेंट गाइड यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीची मूळ किंमत 19,990 रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलेमध्ये तुम्हाला तो 13,049 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

वनप्लस 32 इंचाचा एचडी टीव्ही -

स्मार्टफोननंतर वनप्लसने गेल्या वर्षी टीव्ही लाँच केला होता. अलीकडेचं कंपनीने 32 इंचाचा एचडी रेडी मॉडेल बाजारात आणला आहे. या टीव्हीची एमआरपी 19,999 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तुम्हाला तो 12,599 रुपयात घेता येऊ शकतो.

रियलमी 43 इंच फुल HD आणि 32 इंच HD टीव्ही -

रिअलमेने नुकतीच स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. Realme हळूहळू मार्केटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करीत आहे. Realme चा 32 इंचाचा एचडी रेडी आणि 43 इंचाचा फुल एचडी टीव्ही अँड्रॉइड टीव्ही ओएसवर चालतो. या टीव्हीचा स्क्रीन रीफ्रेश दर 60 हर्ट्ज आहे. Realme चा 43 इंचा टीव्हीची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. मात्र, हा टीव्ही तुम्हाला सेलमध्ये 18,249 रुपयांमध्ये घेता येईल. तसेच Realme चा 32 इंचाचा एचडी टीव्ही 14,999 रुपयांऐवजी 9,899 रुपयांमध्ये घेता येईल.

नोकिया 32-इंच एचडी रेडी टीव्ही -

नोकियाने अलीकडेच आपल्या टीव्ही लाइनअपमध्ये नवीन फोन बाजारात आणले आहेत. 32 इंचाच्या रेडी स्मार्ट टीव्हीवर एक ओन्क्यो साउंडबार आहे, जो 39 वॅट ध्वनी आउटपुट देतो. हा टीव्ही अँड्रॉइड 9 टीव्ही ओएसवर चालतो. या टीव्हीची एमआरपी 19,999 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तो 11,699 रुपयात घेता येऊ शकतो.

पॅनासोनिक 40 इंचाचा फुल एचडी टीव्ही -

पॅनासॉनिकचा अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये घेतला जाऊ शकतो. स्मार्ट टीव्हीला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि डिस्ने + हॉटस्टार सारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. याच गूगल असिस्टेंट आधीपासूनचं उपलब्ध आहे. टीव्हीची एमआरपी 24,990 रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तो 18,249 रुपयांमध्ये घेता येऊ शकतो.

Mi 4 ए प्रो 43 इंचाचा पूर्ण एचडी टीव्ही -

शाओमीने स्मार्ट टीव्ही मार्कटमध्ये प्रवेश केला. स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड ओएसवर चालतो आणि त्यात गूगल असिस्टंट सपोर्ट आहे. या टीव्हीमध्ये अंगभूत क्रोमकास्ट आहे. टीव्ही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूब ला सपोर्ट करतो. टीव्हीची एमआरपी 25,999 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये तो 20,240 रुपयांमध्ये घेता येऊ शकतो.